चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या

On: July 5, 2020 7:55 PM

पुणे(मावळ) : चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीवर धारदार कोयत्याने सपासप वार करत तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना आज समोर आली. देहूरोड पोलिस स्टेशनच्या हद्दीत साई नगरात आज सकाळी ही घटना घडली.

पतीने केलेल्या हल्ल्यात 32 वर्षीय आबेदा शेख या महिलेचा उपचार सुरू असतांना ग्णालयात मृत्यू झाला. हल्लेखोर पती घटनास्थळावरून फरार झाला आ
आज सकाळी आठच्या सुमारास आबेदा ही नेहमीप्रमाणे खासगी कंपनीत कामासाठी जात होती.

हेही वाचा http://crimeduniya.com/?p=663

त्यावेळी पती करीम तिचा पाठलाग करत होता. वाटेतच आबेदाच्या डोक्यावर आणि हातांवर तिच्या पतीने पाच ते सात सपासप वार केले. पत्नीवर हल्ला करून आरोपी पती घटनास्थळावरून फरार झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आबेदास जमलेल्या स्थानिक नागरिकांनी देहूरोड येथील आधार रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना अतिरक्तस्त्रावामुळे आबेदाचा मृत्यू झाला.

मयत आबेदा हिचा पती करीम तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यावरून दोघात कडाक्याचे भांडण होत असे. या वादातून करीमने आबेदाचा खून केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिस आरोपीच्या मागावर आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment