माजी आ. दिलीप वाघ जिल्हा नियोजन समितीवरील विशेष निमंत्रीत

On: March 17, 2021 12:52 PM

पाचोरा (प्रतिनिधी) : जिल्हा नियोजन समितीवर 18 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात 4 नामनिर्देशीत तर 14 विशेष निमंत्रीत आहेत. नामनिर्देशित सदस्यांमध्ये जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे – खेवलकर (मुक्ताईनगर), डॉ. डी. जी.पाटील (धरणगाव), शिवाजीराव रावसाहेब पाटील (धानवड, ता.जळगाव), राधेश्याम माधवलाल कोगटा (विसनजी नगर जळगाव) यांचा समावेश आहे.

विशेष निमंत्रितांमध्ये माजी आमदार दिलीप ओंकार वाघ (जयदुर्गानगर, पाचोरा), माजी महापौर नितीन बालमुकुंद लढ्ढा (सालारनगर, जळगाव), संजय भास्करराव गरुड (शेंदुर्णी, ता. जामनेर), मनोहर गिरधर पाटील (निपाणे, ता.पाचोरा), साहेबराव धर्मा सोनवणे (चोपडा), विजय सुदाम पाटील (टिटवी, ता. पारोळा), वाल्मीक विक्रम पाटील (त्र्यंबकनगर, जळगाव), मनोहर गिरधर खैरनार (मुक्ताईनगर), भागवत पंडित पाटील (पाडळसरे, ता. अमळनेर), डॉ. सुरेश श्यामराव पाटील (चहार्डी, ता.चोपडा), शेखर सोपान पाटील (सावखेडासीम, ता. यावल) आणि प्रल्हाद रामदास महाजन (रावेर) या सदस्यांचा समावेश आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment