नवी दिल्ली : गृहरक्षक दलाची धुरा हाती न घेता रजेवर गेलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रामुळे खळबळ माजली असून आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभुमीवर भाजप, मनसे या पक्षांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी पुढे केली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्यावर झालेले आरोप फेटाळून लावत एक पत्रक जाहीर करत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
या सर्व घडामोडीवर आधारीत रा.कॉ. सुप्रिमो शरद पवार यांनी एक पत्रकार परिषद घेतली असून त्यातील मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत. चौकशीचे सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांना असून त्यांनी रितसर चौकशी करुन योग्य तो निर्णय घ्यावा. परमबीर सिंग यांनी पत्रात आरोप केले असून पुरावे दिलेले नाहीत. परमबीर सिंग आयुक्त असताना त्यांनी एकही आरोप केलेला नाही. त्यांचे सर्व आरोप बदली झाल्यानंतरचे आहेत. सचिन वाझे यांना पुन्हा पोलिस दलात घेण्याचा निर्णय परमबीर सिंग यांनीच आपल्या अख्त्यारीत घेतला होता. शंभर कोटी रुपये कुणाकडे गेले याबाबतचा तपशील पत्रात देण्यात आलेला नाही. परमबीर सिंग यांची पत्रावर सही नाही. सिंग यांच्या पत्रात पैसे जमा करण्याविषयी माहिती दिलेली नाही. याशिवाय डेलकर प्रकरणी गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप आहेत.