आ. किशोरआप्पा पाटील यांची कोविड सेंटरला भेट

On: March 21, 2021 4:44 PM

पाचोरा (प्रतिनिधी) : आ. किशोर आप्पा पाटील यांनी नुकतीच पाचोरा तालुक्यातील कोरोना बाधीत रुग्णांची भेट घेतली. काही कोरोना बाधीत रुग्ण ग्रामिण रुग्णालयात तर काही शासकीय आयटीआय येथे स्थापन करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमधे दाखल करण्यात आले आहेत.

आ. किशोर पाटील यांनी दोन्ही ठिकाणी जाऊन रुग्णांची भेट घेत विचारपुस करत त्याच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांना वेळच्या वेळी नाश्ता व जेवण मिळते किंवा नाही याची त्यांनी आवर्जून विचारणा केली. प्रशासनाच्या देखील अडचणी त्यांनी लक्षात घेत योग्य त्या उपाययोजना करण्याचे त्यांनी नियोजन केले. यावेळी प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार आर .बी. देवकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.पंकज जाधव, डॉ. प्रतिक भोसले आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment