गोलाणी संकुलातून साडेचार लाखांचा मोबाईल साठा जप्त

On: July 5, 2020 7:42 PM

जळगाव: जळगावच्या गोलाणी व्यापारी संकुलातील दुकानाच्या बाहेर मोबाईल व मोबाईल साहित्य विक्री केल्या प्रकरणी मनपा उपायुक्त वाहूळे यांच्या निर्देशाने दुकानदारांवर जप्तीची कारवाई करण्यात आली.

लॉक डाऊन काळात संकुलातील व्यवसाय करण्यास बंदी आहे. उपायुक्त संतोष वाहुळे यांनी पाहणी केली असता अनेक व्यावसायिक मोबाईल विक्री करत असल्याचे त्यांना दिसून आले. उपायुक्त वाहुळे यांनी मनपाच्या अतिक्रमण निमूर्लन विभागाच्या पथकाला बोलावून कारवाई केली. यावेळी साडेचार लाखांचा मोबाईल साठा जप्त करण्यात आला.

सद्गुरु मोबाईल, सिध्दीविनायक मोबाईल,अष्ट विनायक मोबाईल,नेहा मोबाईल,गोविंद मोबाईल,साईसागर मोबाईल,हरीओम मोबाईल,सम्राट मोबाईल,एसएस मोबाईल,बाबा मोबाईल,तिरुपती मोबाईल यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

वाचा http://crimeduniya.com/?p=663

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment