जालना : राज्यात कोरोना रुग्णांची वाढत असलेली संख्या लक्षात घेता लॉकडाऊन लागण्याची चिन्हे दिसून येत आहेत. औरंगाबाद सह नांदेड, नागपूर, बीड, अमरावती या शहरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे याठिकाणी लॉकडाऊन सुरु आहे.
2 एप्रिल नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊनबाबत परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य तो निर्णय घेणार असल्याचे संकेत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. जिल्हापातळीवरील प्रशासनाला तेथील परिस्थीती बघून योग्य तो निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. काही जिल्ह्यात पाच दिवस तर काही ठिकाणी 8 ते 10 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रात लसीकरणाचे काम वेगात सुरु असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. राज्यातील कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मुख्यमंत्री लक्ष ठेवून आहेत. या पार्श्वभुमीवर लॉकडाऊनबाबत 2 तारखेनंतर निर्णय घेतला जाणार आहे.