सध्या लॉकडाऊन नाही, मात्र निर्बंधाची घोषणा काही दिवसातच

On: April 1, 2021 3:13 PM

मुंबई : राज्यात लॉकडाऊन लागणार असल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. मात्र सद्यस्थितीत लॉकडाऊन होणार नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. लॉकडाऊन होणार नसले तरी तशी व्यवस्था सरकारला करुन ठेवणे देखील गरजेचे असल्याचे राजेश टोपे यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलतांना म्हटले आहे.

2 एप्रिल पासून राज्यात लॉकडाऊन लागणार अशी चर्चा सर्वत्र सुरु असतांना याबाबत आरोग्यमंत्र्यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. मात्र सर्वच नागरिकांनी सोशल डिस्टन्स आणि मास्क वापरण्याचे तंतोतंत पालन केले तर कोरोनावर मोठ्या प्रमाणात आळा बसू शकेल व लॉकडाऊनचा प्रश्न निर्माण होणार नसल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता कठोर निर्बंधांची गरज असून त्यासंदर्भात लवकरच काही दिवसात घोषणा केली जाणार आहे. लॉकडाऊन हा अखेरचा पर्याय ठेवण्यात आल्याचे देखील टोपे यांनी म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment