नाशिक जिल्हा न्यायालय इमारतीस आग

On: April 1, 2021 5:08 PM

नाशिक : नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीस आज गुरुवार 1 एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजेचय सुमारास आग लागण्याची घटना घडली. आगीमुळे परिसरात धुराचे साम्राज्य निर्माण झाले होते. लागलेल्या आगीची घटना बघणा-यांनी घटनास्थळावर गर्दी केली होती.

न्यायालय आवारात न्यायाधीश, वकील व पक्षकार यांची पळापळ झाली. या आगीवर अग्निरोधक यंत्राने नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तो प्रयत्न अयशस्वी ठरला. आगीचे मोठ्या प्रमाणातील रुप बघता अग्नीशमन दलाचे बंब बोलावण्यात आले. आगीच्या भक्षस्थानी सापडलेल्या रेकॉर्ड रुममधील कागदपत्रे जळून खाक झाली असल्याचे समजते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment