पत्त्याच्या क्लबवर छापा,33 जणांना अटक

लाखोंचा ऐवज जप्त ; बारामतीत कारवाई

बारामती : बारामती तालुक्यातील माळेगाव येथे पोलिसांनी पत्त्याच्या क्लबवर छापा टाकत धाडसी कारवाई केली आहे. राजरोसपणे सुरू असलेल्या पत्त्याच्या क्लबवर छापा टाकल्याने बारामती शहरात खळबळ माजली आहे. या कारवाईत 33 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी ताब्यातील आरोपींकडून 7 दुचाकीसह, एक कार, जुगाराचे साहित्य असा एकुण 9 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या पथकाने या कारवाईला मुर्त स्वरुप दिले. माळेगावच्या हद्दीत रमाबाई नगर भागातील एका बंगल्यात हा बेकायदेशीर पत्त्यांचा क्लब सुरु होता. क्लब चालक रमण गायकवाड यांच्यासह 33 जणांवर कारवाई करण्यात आली.

वाचा लग्नापूर्वी ४ वर्ष प्रेमसंबंध लग्नानंतर ४ दिवसांत दोघांची आत्महत्या

अटकेतील सर्व  आरोपींविरुद्ध बारामती तालुका पोलिस स्टेशनला जुगार प्रतिबंधक कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक संदीप गोसावी, पोलिस हवालदार सुरेश भोई, रमेश केकान ,आप्पा दराडे, वैभव साळवे, गणेश काटकर ,राहुल लांडगे ,दत्तात्रय गवळी आदींनी कारवाई पुर्ण केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here