लग्नापूर्वी ४ वर्ष प्रेमसंबंध लग्नानंतर ४ दिवसांत दोघांची आत्महत्या

On: July 5, 2020 7:39 PM

गाझियाबाद: दिल्लीनजीक गाझियाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रेम विवाहानंतर केवळ चारच दिवसांत नवविवाहित दाम्पत्यानं आपली जीवनयात्रा संपवल्याचा प्रकार समोर आला आहे. लग्नानंतर पतीने धावत्या रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली.

त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पत्नीने गळफास लावून आपलेही जीवन संपवले. चार वर्षांच्या प्रेमानंतर नवविवाहित दाम्पत्याने अशा प्रकारे टोकाचे पाऊल उचलल्यानं दोघांच्या परिवाराला धक्का बसला आहे.

वाचा http://crimeduniya.com/?p=875

गाझियाबादमधील कवीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील गोविंदपुरम भागात वास्तव्यास असलेल्या दाम्पत्याने हे टोकाचे पाऊल का उचलले हे समजू शकले नाही.

आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव विशाल असून तो कोचिंग क्लास चालवायचा तर त्याची पत्नी बहुराष्ट्रीय कंपनीत एचआर मॅनेजर होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment