दारुची चोरटी वाहतूक ; दोघांवर कारवाई

काल्पनिक छायाचित्र

भुसावळ बाजारपेठ पोलिसांची कारवाई

भुसावळ : भुसावळ शहरातील व्दारका नगर भागात दोघे जण दारुची चोरटी वाहतूक करत असल्याच्या गुप्त माहीतीनुसार बाजारपेठ पोलिसांच्या पथकाने आज कारवाई केली. या कारवाईत दोघांसह मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. 

पो.नि. दिलीप भागवत यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार घटनास्थळी पथक रवाना करण्यात आले. पथकाने दारुची चोरटी वाहतुक करणा-या दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून मोटार सायकल (एमएच 19 बीडी 9358 तसेच कॅनन बियर 24 बाटल्या, ट्युबर कंपनीच्या बियरच्या 12 बाटल्या, टॅंगो कंपनीच्या देशी दारुच्या 48 नग बाटल्या असा एकुण 28076 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हेही वाचा लग्नापूर्वी ४ वर्ष प्रेमसंबंध लग्नानंतर ४ दिवसांत दोघांची आत्महत्या

या प्रकरणी पो.कॉ. रमेश परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार प्रोव्हीशन मु.पो.अँक्ट क.65(अ),(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.  या कारवाईत सपोनि संदीप परदेशी,पो.ना.रमण सुरळकर उमाकांत पाटील पो.कॉ. विकास सातदिवे,दिनेश कापडणे, प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास पो.ना.रमण सुरळकर करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here