राज्यातील आठ जिल्ह्यात कठोर निर्बंध लावले जाणार असल्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एका वृत्त वाहीनीला बोलतांना दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड आणि अहमदनगर या शहरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे या आठ जिल्ह्यात कठोर निर्बंध लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसे संकेत आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुंबईची लोकल सेवा पुर्णपणे बंद केली जाणार नसून त्यासंदर्भात नव्या मार्गदर्शक सुचना दिल्या जाणार आहेत. लोकलमधे कसे रहावे याचे काही नियम जारी केले जाणार असल्याचे देखील राजेश टोपे यांनी एका वृत्त वाहिनीसोबत बोलतांना दिले आहेत.