राज्यात कोणत्याही क्षणी लॉकडाऊनची शक्यता ?

uddhav thackeray

मुंबई : राज्य सरकारने लॉकडाऊनचा इशारा दिला असला तरी लॉकडाऊनची घोषणा केलेली नाही. राज्यातील कोरोना रुग्णसंख्या अशीच झपाट्याने वाढत राहिली तर मात्र वैद्यकीय सेवा पुरवणारे डॉक्टर आणि नर्सेस पुरेशा प्रमणात आणायचे कुठून? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. अशा स्थितीत लॉकडाऊन हा पर्याय नसला तरी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन करण्याचे ठाकरे सरकारने जवळपास निश्चित केल्याचे समजते. ठोस उपाय मिळत नसल्यामुळे राज्यात कोणत्याही क्षणी लॉकडाऊनची घोषणा केली जाऊ शकते असे मंत्रालयीन सुत्रांनी म्हटले आहे. त्या दृष्टीने प्रशासनची तयारी आणी पर्यायी व्यवस्था सुरु असल्याचे देखील म्हटले जात आहे.

शुक्रवारी राज्यात 47 हजारापेक्षा अधिक कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले. रुग्ण संख्येतील वाढ अशीच सुरु राहिली तर वैद्यकीय सेवा बजावण्यासाठी लागणारे बेड्स आणि व्यवस्था अपुरी पडेल. तज्ञांशी बोलून लॉकडाऊनचा निर्णय घेण्याचा इशारा मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला होता. त्यामुळे लॉकडाऊन केव्हाही होऊ शकते असे जवळपास निश्चित समजले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here