मुंबई : राज्यात वाढत असलेले कोरोना विषाणूचे थैमान आणि वाढत असलेली रुग्णसंख्या लक्षात घेता निर्णय घेण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी तीन वाजता बैठक बोलावण्यात आली आहे. सर्व मंत्रीगण व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीला उपस्थित राहतील.
आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत लॉकडाऊनबाबतचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.