मुंबई : शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप झाल्यानंतर अडचणीत आल्यानंतर अनिल देशमुख यांना आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची वेळ आली. आता त्यांच्या जागी दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्रीपदाची सुत्रे हाती घेतली आहेत.
राज्याचे नुतन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आपल्या पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त केली. सध्याचा काळ अतिशय अवघड आणि चॅलेंजिंग असल्याचे वळसे पाटील म्हणाले. गृहमंत्रीपदाची जबाबदारी आपण योग्य रितीने पार पाडेन व प्रशासकीय कामात राजकीय हस्तक्षेप करणार नसल्याचे त्यांनी म्हटले. आता आगामी दिवस सण उत्सवाचे आहेत. गुढीपाडवा, रामनवमी, आंबेडकर जयंती, रमजानसारखे सण येणार आहेत. सर्व धर्मीयांच्या दृष्टीने हे सण महत्वाचे आहेत त्यामुळे या महिन्यात आपल्यासमोर आणखी आव्हानात्मक परिस्थिती राहणार असल्याचे गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले.