लोक बगावत करण्यापुर्वी निर्णय मागे घ्या – प्रकाश आंबेडकर

On: April 7, 2021 4:23 PM

पुणे : लोकांचे हातावर पोट असून सर्वच समाजघटकांना लॉकडाऊनचा फटका बसत आहे. कोरोनाची ताकद कमी झाल्याचे सांगत असतांना दुसरीकडे मात्र लॉकडाऊनचा कठोर निर्णय घेतला जात आहे. लोक बगावत करण्यापुर्वी ठाकरे सरकारने आपला निर्णय मागे घ्यावा असा इशारा बहुजन वंचीत आघाडीचे सुप्रिमो डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

पुणे येथे आयोजीत एका पत्रकार परिषदेत डॉ. आंबेडकर बोलत होते. पुढे बोलतांना डॉ. प्रकाश आंबेडकर म्हणाले की पंढरपूर येथील व्यावसायीकांना आता भिक्षा मागण्याचा प्रसंग आला आहे. लोक बगावत करण्यापुर्वी ठाकरे सरकारने आपला लॉकडाऊनचा निर्णय मागे घ्यावा. दुकानदार ऐकण्याच्या तयारीत नाहीत. आम्ही दुकानदारांसमवेत असून तुरुंगात जाण्याची वेळ आली तरी हरकत नसल्याच्या भुमिकेत आंबेडकर यांनी आपले म्हणणे मांडले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment