प्रतिशोधाच्या आगीत पवन उठला पेटून ! दोघांच्या मदतीने पुंडकरांना टाकले मारुन !!

Tushar pundkar

 
अकोला : दि. 21 फेब्रुवारी रात्री साडेदहा वाजेची वेळ
होती. प्रहार जनशक्ती संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार नाजुकराव पुंडकर हे
नेहमीप्रमाणे कोट येथील खुमकर दूध डेअरीसमोर बसले होते. दररोज या ठिकाणी बसून ते मोबाईलवर चॅटिंग करायचे. या दिवशी ते फोनवर बोलत-बोलत पोलीस वसाहतमध्ये फिरत होते. बाजूला पोलीस वसाहत असल्यामुळे तसा हा परिसर
सुरक्षित म्हटला जातो. तुषार पुंडकर फोनवर बोलत असतांना अचानक त्याठिकाणी काही
युवक आले. त्यांना पाहताच तुषार पुंडकर मनातून काहिसे घाबरले.
पुंडकर त्या
युवकांना ओळखत असावे. या युवकांकडून आपल्यावर हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेत
तुषार पुंडकर पोलीस वसाहतीच्या दिशेने पळाले. या संधीचा फायदा घेत त्या
युवकांनी त्यांच्या पाठीवर बेछूट गोळीबार सुरु केला. यापैकी
दोन गोळ्या पाठीवर, एक गोळी डोक्यात लागल्यामुळे
तुषार पुंडकर रक्ताच्या थारोळ्यात पडले. गोळीबारानंतर ते युवक अंधाराचा फायदा घेत
तेथून पसार होण्यात यशस्वी झाले.
अचानक झालेल्या गोळीबाराच्या आवाजाने परिसरातील
लोक
पटापट बाहेर आले. काही लोकांनी तुषार पुंडकर यांना
तातडीने अकोट
येथील खाजगी रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी
दाखल
केले. त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्यामुळे
त्यांना
तेथून तात्काळ अकोला येथे दुस-या खासगी दवाखान्यात हलवण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अकोला पोलीस दलाची कुमक, दंगा काबू पथक तात्काळ
अकोट येथे रवाना करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल
गावकर
, ठाणेदार संतोष महल्ले, ठाणेदार ज्ञानोबा फड, पोलीस निरीक्षक नागरे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक सपकाळ, ममता बादे, श्रीनिवास राठोड अशा सर्व वरीष्ठ अधिकाऱ्यांना
घटनास्थळावर पाचारण करण्यात आले. सर्व कायदेशीर सोपास्कार तात्काळ सुरु करण्यात
आले.
पळून जात असतांना मारेक-यांचा मोबाईल खाली पडला
होता. तो मोबाईल उचलतांना
एक संशयीत हल्लेखोर आरोपी सी.सी.टी.व्ही. कॅमे-यात कैद झाला मात्र त्याचा
चेहरा
अस्पष्ट होता.
तुषार पुंडकर यांच्यावर अकोल्यातील खासगी
रुग्णालयात
वैद्यकीय उपचार सुरु करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न
करुन देखील यश आले नाही. दुस-या दिवशी
पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
तुषार
पुंडकर यांच्या निधनाची वार्ता जिल्हयात पसरताच तणाव निर्माण झाला. अकोल्याचे पालकमंत्री बच्चू
कडू तातडीने
आकोट शहरात दाखल झाले. प्रहार जनशक्ती संघटनेचे
विदर्भातील
सर्व कार्यकर्ते आकोटात पोहोचले. संभाव्य परिस्थिती
पहाता
अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक
मकरंद
रानडे यांनी दुसऱ्याची दिवशी आकोटला भेट देऊन वरीष्ठ
 पोलीस अधिकाऱ्यांची
बैठक
घेतली आणि तपासाबाबत आवश्यक त्या सूचना केल्या.
तुषार पुंडकर यांचे
मारेकरी शोधण्यासाठी अकोला पोलीस दलाचे २० पथक
गठित करण्यात आले.
तुषार पुंडकर यांच्या निधनानंतर त्यांचे
पार्थिव अकोट
येथे त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. दुपारच्या
सुमारास रामेश्वर
स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार
पडले. यावेळी
अकोला जिल्हयातील आमदार नितीन देशमुख, आमदार राजकुमार पटेल, पालकमंत्री बच्चू कडू, आमदार बाजोरिया, माजी मंत्री गुलाबराव गावंडे, कांग्रेस नेते हिदायत पटेल, सत्यपाल महाराज, दिलीप बोचे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित
होते.
या घटनेनंतर तब्बल महिना उलटला. तुषार पुंडकर यांच्या मारेक-यांचा
तपास जणू काही रेंगाळला असे वाटत असले तरी पोलिसांचा तपास त्याच्या पद्धतीने सुरुच
होता. दरम्यान महिना उलटल्यनंतर सर्वत्र कोरोना व्हायरसमुळे जनजीवन विस्कळीत झाले.
आता तपास अजून रेंगाळला असे जनसामान्यात बोलले जात होते. पुंडकर यांच्या हत्येनंतर
अनेक चर्चांना ऊत आला होता. राजकीय
खंडणी
प्रकरणातून त्यांची हत्या करण्यात आल्याचा कयास लावला जात होता. त्यामुळे
पोलिसांनी सर्वच दृष्टीकोनातून तपास करत आकोट मधील अनेक संशयीतांची उलट तपासणी
केली होती. परंतु या तपासणीत काहीही निष्पन्न झाले नव्हते. अखेर पोलिस अधिक्षक
अमोघ गावकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक शैलेश
सपकाळ यांनी हत्याकांडाची सुत्रे हाती घेत तपासाची चक्रे फिरवली आणि आरोपींना
गजाआड करण्यात यश मिळवले.
 26 मार्च रोजी पवन नंदकिशोर
सेदानी
, श्याम
उर्फ स्वप्निल पुरुषोत्तम नाठे आणि अल्पेश भगवान दुधे या तिघा संशयित
मारेक-यांना पकडल्याची वार्ता पोलिस
दलाने उघड केली.
या हत्याकांडाने
जिल्हाभरात मोठी खळ्बळ उडाली होती.
 
तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार सुमारे
सात वर्षापुर्वी 11 सप्टेबर 2013 मधे तेजस सेदाणी याने काही युवकांसह शिवाजी कॉलेज
रोडवर नविन गणेश मंडळाची स्थापना केली होती. परिसरात एकच गणेशोत्सव मंडळ असावे अशी
पुंडकर यांची अपेक्षा होती. या गणेशोत्सव मंडळाला तुषार पुंडकर यांचा विरोध होता.
त्यामुळे तुषार पुंडकर व त्यांच्या सहका-यांनी तेजस सेदानी याची धारदार शस्त्र व
लोखंडी पाईपाने मारहाण करुन निर्घृण हत्या केली होती.
सन 2013 मधे सरस्वती नगरातील
तेजसच्या या हत्येचा बदला घेण्यासाठीच त्याचा चुलत भाऊ पवन सेदानी याने तुषार
पुंडकर यांच्या हत्येचा कट रचल्याचा प्रकार तपासात पुढे आला. पवन सेदानी याने आपले
साथीदार श्याम नाठे आणि अल्पेश दुधे यांच्या मदतीने पुंडकर यांच्यावर देशी
कट्ट्यातून गोळीबार करुन त्यांची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले. पोलिसांनी अटक
केलेले अल्पेश दुधे आणि श्याम नाठे हे शुटर्स असल्याचे देखील तपासात पुढे
आले. 
या हत्याकांडाचा तपास उघड
करण्यात विशेष पोलिस महानिरिक्षक मकरंद रानडे
, पोलिस अधिक्षक अमोघ गावकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे
शैलेश सपकाळ
, आकोट शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक संतोष महल्ले,
पोलिस निरिक्षक मिलिंद बहाकर, बुलढाणा येथील
पोलिस निरिक्षक कैलास नागरे
, सपोनि चंद्रकांत ममताबादे,
पोलिस निरिक्षक नागेश चतरकर (बुलढाणा), सपोनि
श्रीनिवास राठोड (नांदेड)
, सायबर सेलचे पोनि शैलेश ठाकरे,
उप निरिक्षक सागर हटवार, तुषार नेवारे,
शैलेश म्हस्के, रणजितसिंग ठाकुर यांच्यासह
सुमारे 70 पोलिस कर्मचा-यांनी तपासकामी मोलाची भुमीका बजावली.
तपास पथकातील अधिकारी व
कर्मचा-यांनी अथक परिश्रमानंतर हा गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल अमरावती
परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक मकरंद रानडे यांनी कौतुक केले आणि अधिकारी
,
कर्मचा-यांना 50 हजार रुपयांचे रिवॉर्ड जाहीर केले.
पोलिसांनी अटक केलेले अल्पेश
दुधे(24)
, श्याम नाठे (22) हे
शार्प शुटर असून या दोघांनीच तुषार पुंडकर यांच्यावर देशी कट्ट्यातून गोळीबार
केल्याची बाब पोलिस तपासात समोर आली.  या
हत्याकांडात पोलिसांनी प्रारंभी तिघांना अटक केली असली तरी गुन्हयाची व्याप्ती
बघता या हत्याकांडात आणखी काही आरोपी वाढण्याची शक्यता असल्याचे देखील बोलले जात
आहे. या हत्याकांडामागे व्हाईट कॉलर गुन्हेगारांचे पाठबळ असण्याची दाट शक्यता
असल्याचे देखील बोलले जात आहे.
सन 2013 मधे मयत झालेला तेजस
सेदानी हा खुनशी स्वभावाचा होता. मात्र त्याच्या खूनाचा नंतर कुणी बदला घेईल अशी
शक्यता वाटत नव्हती. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पवन सेदानी या मुख्य
संशयितासह  अल्पेश दुधे व श्याम उर्फ
स्वप्नील नाठे यांचा कुठल्याही मोठ्या गंभीर गुन्हयात सहभाग नव्हता. त्यांचे
क्राईम रेकॉर्ड नसल्यामुळे त्यांच्यावर पोलिसांचा सहजासहजी संशय गेला नाही. खोलात
गेल्यावर काही धागेदोरे हाती आले. मारेकरी बाहेरगावचे अथवा पर राज्यातील असावे असा
एक कयास होता. मात्र तिघेही आरोपी हे आकोट येथीलच असल्याचे तपासात निष्पन्न
झाले.  
 
तुषार नाजुकराव पुंडकर
हे
अकोला जिल्हयाच्या अकोट तालुक्यातील आसेगाव बाजार येथील मूळ रहिवासी होते. प्रहार जनशक्ती संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष असलेल्या तुषार
पुंडकर यांनी
सर्वप्रथम राष्ट्रवादी
काँग्रेस
पक्षात, त्याच्यानंतर सुधार विकास समितीमध्ये काम केले. यानंतर त्यांनी प्रहार संघटनेसोबत संधान साधून बच्चू कडू यांचा विश्वास संपादन
केला. कालांतराने ते बच्चू कडू यांचे खंदे समर्थक म्हणून सर्वत्र ओळखले जावू लागले.
प्रहार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी तुषार पुंडकर
यांच्यावर सोपवण्यात आल्यानंतर या संघटनेची जिल्हाभर ताकद वाढली. एवढेच नव्हे तर प्रहार जनशक्ती पक्षातर्फे अकोट विधानसभा मतदारसंघातून तुषार पुंडकर यांनी सन 2019 ची विधानसभा
निवडणूक लढवली. या निवडणुकीमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी समोर असतांनासुद्धा तुषार पुंडकर
यांनी 27 हजाराच्यावर मताधिक्य घेऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. या मतदारसंघातून
तुषार पुंडकर पराभूत झाले असले तरी त्यांच्या मागे असलेला जनसमुदाय हा मोठ्या प्रमाणात
त्यांच्यासाठी काम करत होता
, हे त्यांच्या मताधिक्यावरून सिद्ध झाले.
तुषार पुंडकर पराभूत झाल्यानंतर
प्रहार जनशक्ती संघटनेचे अस्तित्व संपले असे चित्र दिसत असतांना पक्षाचे संस्थापक बच्चू
कडू यांची राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागली. योगायोग म्हणजे बच्चू कडू यांच्यावर अकोल्याच्या
पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. यानंतर तुषार पुंडकर पुन्हा फार्मात आले.
बच्चू कडू यांच्या आगमनानिमित्त अकोला शहरभर तुषार पुंडकर यांनी लावलेले पोस्टर हा
सर्वत्र चर्चेचा विषय बनला होता. बच्चू कडू यांनी यानंतर प्रहार संघटनेची कार्यकारिणी
बरखास्त केल्यामुळे तुषार पुंडकर यांचे जिल्हाध्यक्षपद आपोआप कमी झाले. जिल्हाध्यक्ष
पद गेल्यानंतरही एक सेवक म्हणून तुषार पुंडकर यांनी आपले काम
सुरू ठेवले. तुषार पुंडकर यांच्यावर एक खुन व अन्य किरकोळ स्वरूपाचे गुन्हे दाखल
असल्यामुळे तसे ते सर्वांच्या परिचयाचे होते.
तुषार पुंडकर यांची वयाच्या 29 व्या वर्षी हत्या
करण्यात
आली. तुषार पुंडकर यांनी आपल्या राजकीय जीवनाची यशस्वी सुरूवात केली
होती
. राजकारणात असतांना
त्यांनी
अनेक वरीष्ठ लोकांसोबत चांगले संबंध प्रस्थापित
केले.
दरम्यान त्यांनी आईलासुद्धाकोट नगरपरिषदमध्ये
निवडून
आणले होते. राजकारणाचा कोणताही वारसा नसतांना
तुषार
पुंडकर राजकारणात पुढे आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here