सिरियल किलरने पचवले दोन खूनाचे यश ! तिस-या खूनानंतर त्याच्या पदरी आले अपयश !!



सिरियल किलरने पचवले दोन खूनाचे यश ! 

 तिस-या खूनानंतर त्याच्या पदरी आले अपयश !! 



जळगाव : यश चंद्रकांत पाटील हा बावीस वर्ष
वयाचा दहावी पर्यंत शिकलेला रिकामटेकडा तरुण. जळगाव जिल्हयाच्या यावल तालुक्यातील डांभुर्णी
या गावचा तो रहिवासी आहे. टीकटॉक व्हिडीओ तयार करणे आणि मिळेल ती दारु पिणे हा त्याचा
शौक आहे. तयार केलेले टीकटॉक व्हिडीओ लहान बालकांना दाखवून त्यांच्याशी जवळीक निर्माण
करणे हा देखील त्याचा एक रिकामा उद्योग आहे. “अगर किसीको मै पसंद नही हू तो कोई बात
नही
, हर किसीकी चॉईस अच्छी थोडी होती है, दोनो
बाते तो सही है” असा संवाद त्याने त्याच्या टीकटॉक व्हिडीओत टाकला होता.
लहान बालकांसोबत अनैसर्गीक अत्याचार करणे
ही यश पाटील याची विकृती म्हटली जाते. हि विकृती पुर्ण करण्यासाठी तो लहान बालकांना
अर्थात विद्यार्थ्यांना टार्गेट करत असे. टीकटॉक व्हिडीओ दाखवण्याच्या बहाण्याने तो
लहान बालकांसोबत जवळीक निर्माण करत असे. एकदा का एखादा बालक त्याच्या जाळ्यात अडकला
म्हणजे दारुच्या नशेत तो त्या बालकांना टीकटॉक व्हिडीओ दाखवण्याचे आमिष दाखवून एकांतात
घेवून जात असे. त्याठिकाणी तो त्या बालकांसोबत अनैसर्गीक अत्याचार करत असे. एवढ्यावरच
त्याचे समाधान होत नसे तर तो त्या बालकांच्या डोळ्यात काड्या घालून डोळे फोडून टाकत
असे. डोक्यात दगड घालून त्यांचा खून करत असे. ही त्याची विकृती होती. त्याची ही विकृती
दिवसेंदिवस वाढत गेली. त्याला या कृत्यातून अघोरी आनंद मिळत होता. हा सर्व प्रकार तो
दारुच्या नशेत करत होता. 
एवढे कमी झाले म्हणून की काय लोकांच्या
चर्चेतून मिळालेल्या माहीतीनुसार यश पाटील हा मोकाट कुत्र्यांना देखील सोडत नव्हता.
मोकाट कुत्र्यांसोबत गैरकृत्य केल्यानंतर तो त्यांचे डोळे काढून घेत असल्याची चर्चा
परिसरात चर्चिली जात आहे. याशिवाय फोडलेल्या डोळ्यांचे रक्त देखील तो पित असल्याची
चर्चा सुरु आहे.
मनोविकृत यश पाटील याने 28 ऑगस्ट 2018 रोजी
डांभुर्णी येथील एका विद्यार्थ्याच्या डोळ्यात काड्या घालून त्याला जखमी केले होते.
त्यावेळी तो बालक मोठ्या प्रमाणात जखमी झाला होता मात्र सुदैवाने बचावला होता. डोळ्यात
काड्या घातल्याने तो लहान बालक वेदनेने खुप तळमळला होता. या प्रकरणी यावल पोलिस स्टेशनला
त्यावेळी भा.द.वि. 326 नुसार रितसर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयात यश पाटील
यास अटक झाली होती. अटके नंतर काही दिवसांनी त्याची जामीनावर सुटका झाली होती.
यश याच्या अशा चुकीच्या वागण्याला कंटाळून
त्याच्या परिवाराने त्याला भडगाव येथे त्याच्या मावशीकडे पाठवून दिले होते. भडगाव येथे
गावाबाहेर असलेल्या एका बियर बारवर वेटर म्हणून तो काम करु लागला. दरम्यान त्याच्या
संपर्कात इशम सैय्यद हा अवघा नऊ वर्षाच बालक आला. इशम याचे आई वडील परप्रांतीय होते.
ते मोलमजुरी करण्यासाठी उत्तर प्रदेशातून टोणगाव ता. भडगाव येथे वास्तव्याला आले होते.
गरिब कुटूंबातील नऊ वर्षाच्या इशम यास यश याने त्याच्या नादी लावले. गेल्या वर्षी
21 मार्च 2019 रोजी गोड बोलून तो त्याला निर्जन केळीच्या शेतात घेवून गेला. त्या ठिकाणी
त्याने इशम सैय्यदसोबत अनैसर्गीक कृत्य केले. त्यानंतर यश याने इशमचे डोळे फोडून त्याची
हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह जवळच असलेल्या केळीच्या बागेत यश याने फेकून दिला.
भडगाव पोलिसात हा गुन्हा दाखल असून तपासावर आहे.  
अशा प्रकारे एका मागून एक घटना घडत होत्या.
यश पाटील याची ही विकृती दिवसेंदिवस वाढतच होती. लहान बालके त्याचे टार्गेट रहात होते.
त्यानंतर काही दिवसांनी तो पुन्हा आपल्या
गावी डांभुर्णी येथे परत आला. जवळच असलेल्या भोकर या गावी एका नातेवाईकाच्या लग्नात
12 मार्च 2020 रोजी तो व-हाडी मंडळींसोबत आला होता. या ठिकाणी त्याच्या नजरेने रोहीत  नवल सैंदाणे या अकरा वर्षाच्या बालकाला हेरले. रोहित
नवल सैंदाणे हा अकरा वर्षाचा बालक दोन बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. तो या लग्नात हौसेपोटी
पंगतीत वाढण्यासाठी व जेवण करण्यासाठी आला होता. लग्नाच्या व-हाडींसोबत भोकर या गावी
आलेल्या यश याने रोहित यास टार्गेट केले. सायंकाळी त्याने रोहित यास शौचास कुठे जातात
असा प्रश्न केला. सोबत शौचास जाण्यासाठी पाण्याने भरलेला डबा भरुन आणण्यास सांगीतले.
गोड बोलून टीकटॉक व्हिडीओ दाखवत त्याने निरागस रोहित यास शौचास सोबत नेले अर्थात नकळत
त्याचे अपहरण केले. गावाबाहेर दोघे जण गेल्यानंतर यश याने रोहित सोबत अनैसर्गीक कृत्य
करत आपली कामवासना व विकृती साध्य केली. त्यानंतर यश याने निरागस व निष्पाप रोहित याचे
डोळे काड्या घालून फोडले. त्यानंतर डोक्यात जड वस्तू मारुन त्याची हत्या करण्यात आली.
रात्र झाली तरी रोहित घरी परतला नाही म्हणून
त्याच्या आईवडीलांसह नातेवाईकांची चिंता वाढली. त्यांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात
केली. मात्र सर्वांचे शोधकार्य व्यर्थ ठरले. अखेरीस दुस-या दिवशी सकाळी 13 मार्च रोजी
त्याच्या वडीलांनी जळगाव तालुका पोलिस स्टेशन गाठत आपला मुलगा रोहित याचे अपहरण झाले
असल्याची फिर्याद दाखल केली.
दरम्यान 16 मार्च रोजी सकाळी 8.30 वाजता
गावाजवळ असलेल्या एका मक्याच्या शेतात रोहितचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला.
या शेतात पाणी सोडण्यासाठी गेलेल्या पावरा याला तो मृतदेह दिसला. त्याने लागलीच शेतमालकाला
या घटनेची माहिती दिली. शेतमालकाने जळगाव तालुका पोलिस स्टेशनला या घटनेची माहिती दिली.
पो.नि. रविकांत सोनवणे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. बापू रोहोम
, विजयसिंग पाटील,
जितेंद्र पाटील, तालुका पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरिक्षक गणेश चव्हाण, निशिकांत जोशी,
वासुदेव मराठे, प्रफुल्ल धांडे
यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. रोहीतच्या
अंगावर कपडे नव्हते. चार दिवसांपुर्वी त्याचा मृत्यू झाला असल्याने तो कुजलेला होता.
त्याच्या अंगावरील कपडे शेजारीच पडलेले होते. त्या कपड्यावरुन त्याची ओळख पटली. या
घटनेची माहिती मिळताच धाव घेत आलेल्या त्याच्या पालकांनी मोठा आक्रोश केला. हातमजुरी
करणा-या त्याच्या वडीलांना दोन मुलींसह तो एकुलता मुलगा होता. या प्रकरणी जळगाव तालुका
पोलिसात अज्ञात मारेक-याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी विविध
चर्चांना उत आला होता. अघोरी विद्येचा हा प्रकार असावा असा देखील सुर उमटला होता.
या खूनाचा तपास जळगाव तालुका पोलिसांमार्फत
सुरु होता. मात्र कुठेही तपास लागत नव्हता. याप्रकरणी कुणाला माहिती असल्यास अथवा मिळाल्यास
पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले. मारेक-याचे रेखाचित्र देखील जारी करण्यात आले.
रोहितच्या मारेक-याची माहिती देणा-यास पन्नास हजाराचे बक्षीस पोलिस प्रशासनाकडून जाहिर
करण्यात आले. मात्र तरीदेखील हा तपास पुढे सरकत नव्हता.
अशा प्रकारे ही दुसरी हत्या यश याने केली
आणि पचवली होती. यश याने केलेल्या प्रत्येक हत्येचा तपास लागत नसल्याने व तो पकडला
जात नसल्याने त्याची हिम्मत वाढतच होती. पहिल्या घटनेतील बालक सुदैवाने बचावला होता.
इतर दोन घटनेत दोघा बालकांची हत्या झाली होती.
मनोविकृत यशचे धाडस वाढतच होते. तो रहात
असलेल्या डांभुर्णी गावातील कैलास चंद्रकांत कोळी या सोळा वर्षाच्या बालकाला आता त्याने
टार्गेट केले होते. कैलास कोळी हा त्याच्या चार बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. त्याचे
वडील शेतमजुर असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम होती. कैलास याने नुकतीच दहावीची
परिक्षा दिली होती.
2 एप्रिल रोजी कैलास गावातील त्याच्या आजीच्या
घरी गेला होता. रात्र झाली तरी देखील कैलास त्याच्या आजीच्या घरून परत आला नाही म्हणून
शेतातून आलेले त्याचे वडिल हैरान झाले. त्यांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला मात्र तो
व्यर्थ ठरला. 2 एप्रिलची ती रात्र तशीच गेली. कैलास घरी आलाच नाही. दुस-या दिवशी 3
एप्रिल रोजी सकाळपासून पुन्हा त्याची शोधाशोध सुरु झाली. तपासाअंती त्यांना समजले की
आपला मुलगा केलास हा गेल्या काही दिवसांपासून गावातील यश पाटील या मुलासोबत फिरत होता.
काल दोघांना गावाबाहेर शौचास जातांना एका मुलाने पाहिले होते. त्या माहितीच्या आधारे
यश पाटील याच्या घरी जावून चौकशी केली असता त्याने खोटेच सांगितले की आम्ही दोघे सोबत
सायंकाळी शौचास गेले होते. मात्र मी त्याच्या आधीच परत आलो होतो. त्याच्या बद्दल मला
माहिती नाही. त्यामुळे कैलासचे वडील हताशपणे परतले. वाटेत त्यांनी एका महिलेला विचारपुस
केली असता तिने सांगितले की तुमचा मुलगा काल गावातील यशसोबत शौचास गेला होता. तुम्ही
त्यालाच विचारा. त्यामुळे ते पुन्हा त्याच्या घरी गेले असता त्याची आई घरी होती. तिने
सांगीतले की यश घरी नसून तो तुमच्या मुलालाच बघायला गेला असेल. शेवटी कैलासचे वडील
चंद्रकांत कोळी यांच्या मनात विचारांची कालवाकालव सुरु झाली. त्यांना यश बद्दल शंका
येवू लागली. तो गावातून बेपत्ता झालेला होता.
गेल्या वर्षी त्याने गावातील एका बालकाच्या
डोळ्यात काड्या घालून त्याला जबर जखमी केले होते. तो प्रसंग त्यांना आठवला. त्या प्रसंगाची
आठवण येताच त्यांचे डोके गरगर करू लागले. प्रत्येक जण त्यांना सांगत होता की तुमचा
मुलगा गेल्या काही दिवसांपासून यश सोबतच फिरत होता.
दुपार उलटून गेली. काल सायंकाळपासून कैलासचा
तपास लागत नव्हता. त्यांच्या जिवाची घालमेल सुरु होती. दुपारी चार वाजता त्यांना गावातील
लोकांनी निरोप दिला की तुमचा मुलगा कैलास हा दत्तात्रय पाटील यांच्या शेतात झाडाझुडूपांमधे
मयत अवस्थेत पडलेला आहे. त्यामुळे ते लागलीच तेथे धावत गेले असता खरोखरच कैलासचा मृतदेह
तेथे झाडाझुडूपात रक्तबंबाळ पालथ्या अवस्थेत पडलेला होता. त्याच्या अंगावर अनेक ठिकाणी
जखमा झालेल्या होत्या. त्याच्या डाव्या हाताच्या मनगटास शर्ट बांधून त्याला ओढत आणल्याच्या
खुणा दिसत होत्या.
आपल्या मुलाला नक्कीच गावातील यश पाटील
याने ठार केले अशी त्यांची खात्री झाली. त्यांनी तात्काळ यावल पोलिस स्टेशन गाठत पो.नि.
अरुण धनवडे यांची भेट घेवून सर्व हकीकत कथन केली. या प्रकरणी यश पाटील
याच्या विरोधात फिर्याद दाखल करण्यात आली. सदर फिर्याद यावल पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न.
59/20 भा.द.वि.302
,
364 नुसार दाखल करण्यात आली. या गुन्हयाचा तपास पोलिस उप निरिक्षक सुनिता
कोळपकर यांचे कडे देण्यात आला.   
यश पाटील याने  कैलाससोबत अगोदर अनैसर्गीक कृत्य केले. त्यानंतर
त्याचे डोळे फोडले. त्यानंतर डोक्यात दगड, विटा घालुन त्याची हत्या केली.
या घटनेची माहीती गावात वा-यासारखी पसरण्यास
वेळ लागला नाही. 
कैलासच्या दोन्ही डोळ्यात काड्या खुपसलेल्या होत्या.
डोक्यावर मोठा आघात करून त्याचा खून केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले होते. यावल
पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्यासह पथकाने मारेकऱ्याचा शोध सुरू केला
होता.
28  ऑगस्ट 2018 
रोजी संशयीत यश चंद्रकांत पाटील याने गावातील तिसरीच्या विद्यार्थ्याला खाऊचे
आमिष दाखवत त्याच्यावर अत्याचार केला होता. त्यावेळी त्याने त्या बालकाच्या डोळ्यात
काड्या टोचल्या होत्या. त्यावेळी यश याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर तो जामीनावर
देखील सुटला होता. यावेळी कैलास कोळी याचा खून झाल्याचे उघडकीस आल्यानंतर यश पाटील
गावातून बेपत्ता झालेला होता. गावक
-यांसह पोलिसांचा त्याच्यावर संशय वाढलेला
होता. त्यावेळच्या त्या गुन्हयाची व आताच्या या गुन्हयाची पद्धत तपासण्यात आली. दोन्ही
गुन्हयात सारखीच पद्धत गुन्हेगाराकडून वापरण्यात आली होती. त्यामुळे हाच धागा पकडून
यावल पोलिस स्टेशनचे पो.नि. अरुण धनवडे व त्यांचे सहकारी त्याच्या मागावर निघाले.
शनिवार 4 एप्रिल रोजी
संशयीत यश पाटील हा कोळन्हावी शेतशिवारात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती
मिळताच पोलिस निरीक्षक अरूण धनवडे
, पोलिस उप निरिक्षक
जितेंद्र खैरनार
, महिला पोलिस उप निरिक्षक
सुनिता कोळपकर
, हे.कॉ. संजय तायडे, हे.कॉ. सुनील तायडे, हे.कॉ. विकास सोनवणे, पो.कॉ. राजेश वाढे असा ताफा शेतात हजर झाला. चारही
बाजुने त्याला घेरण्यात आले. पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांनी आपल्या सहका
-यांसह त्याला ताब्यात घेतले. दरम्यान संतप्त नागरिकांनी यश पाटील यास आपल्या ताब्यात घेण्याचा
प्रयत्न केला. बघता बघता वातावरण चिघळण्यास सुरुवात झाली. या प्रकाराची माहिती स्थानिक
गुन्हे शाखेला देण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. बापु रोहोम आपल्या सहका
-यांसह घटनास्थळी दाखल झाले.
संतापलेला जमाव यश पाटील यास आपल्या ताब्यात
घेण्याचा प्रयत्न करत होता. यश पाटील याचा आम्ही आताच्या आता जागेवरच फैसला करतो अशी
भुमीका संतप्त जमाव घेत होता. चिघळलेली परिस्थिती बघता यश पाटील यास स्थानिक गुन्हे
शाखेच्या वाहनाने जळगाव येथे हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
संतप्त लोकांच्या तावडीतून यश पाटील याचा
बचाव करत त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या वाहनातून जळगाव येथे नेण्याची तयारी करण्यात
आली. दरम्यान पोलिसांचे वाहन डांभुर्णी गावातच अडवण्यात आले. संतापलेल्या जमावाला पांगवण्यासाठी
पोलिसांना नाईलाजाने लाठीचार्ज करावा लागला. या लाठीचार्ज दरम्यान नजरचुकीने मयत विद्यार्थी
कैलास कोळी याच्या आई व बहिणीला काठ्यांचा मार बसला. त्यामुळे जमाव अजूनच प्रक्षुब्ध
झाला.
डांभुर्णी येथून संशयीत
यश पाटील यास सरकारी वाहनाने जळगाव येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात तपासकामी
घेवून जात असतांना जमावाने पोलिसांवर हल्ला सुरु केला. या प्रकरणी
पोलिस वाहन चालक देवीदास गणेश रोहील यांनी दिलेल्या
फिर्यादीनुसार हरी दामोदर कोळी
, दिपक उर्फ निलेश
गोपाळ कोळी
, विक्की  सुनील कोळी, सुनिक चुडामन कोळी, मुकेश राजेंद्र कोळी , वासुदेव कोळी, गोरख कोळी, नितिन कोळी, सुभाष कोळी, भुषण कोळी, संभाजी कोळी, किरण कोळी, मोहन कोळी, विकास कोळी, मोहन शालिक कोळी, निलेश कोळी, सचिन ठाकुर, मयुर कोळी, तुषार कोळी, जितेंद्र कोळी, संतोष कोळी, चेतन धनगर, कमलाकर कोळी, व इतर सुमारे सत्तर जणांविरुद्ध यावल पोलिस स्टेशनला
रितसर गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभिर्य लक्षात
घेत फैजपूरचे डीवायएसपी नरेंद्र पिंगळे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीवर कसेबसे
नियंत्रण मिळवले. तरीदेखील संतापलेल्या लोकांनी पोलिसांच्या वाहनाचा पाठलाग सुरु केला.
तो पाठलाग वाटेत ममुराबाद गावापर्यंत लोकांनी सुरुच ठेवला. जणू काही पोलिस खलनायक आहेत
अशी संतापलेल्या लोकांची मानसिकता झाली होती. वाटेत ममुराबाद गावानजीक पाठलाग करणा
-या वाहनधारकांनी अखेर पोलिसांचे वाहन अडवले. त्यांनी थेट पोलिस वाहनावर दगडफेक करण्यास सुरुवात
केली. यश पाटील यास आमच्या ताब्यात द्या. आम्हीच त्याचा फैसला करतो अशी भुमिका संतप्त
लोकांनी घेतली होती. पुन्हा संतापलेले लोक आणि पोलिस यांच्यात धुमश्चक्री सुरु झाली.
हा काय प्रकार सुरु आहे हे ममुराबाद येथील रहिवाशांना अनाकलनिय होता. या घटनेची माहिती
मिळताच जळगाव तालुक पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी ममुराबाद येथे दाखल झाले. त्यांनी
जमावाला पांगवण्याचे काम सुरु केले. या घटनेत सरकारी वाहनाचे नुकसान झाले. संशयिताला
घेवून जाणा
-या पोलिसांना जिवे ठार मारा असे म्हणून
शिवीगाळ करण्यासह सरकारी वाहनाचे नुकसान केल्याप्रकरणी चालक हे.कॉ. इद्रिस खान यांच्या
फिर्यादीनुसार याप्रकरणी जळगाव तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
लोकांच्या तावडीतून सुटका करत कसेबसे यश पाटील यास
जळगाव येथे आणले गेले. त्याला जिल्हापेठ पोलिस स्टेशनच्या कोठडीत ठेवण्यात आले.
दरम्यान डांभुर्णी
गावात तणावाचे वातावरण निवळण्याची चिन्हे दिसून येत नव्हती. सन 2018 मधे डांभुर्णी
गावातील एका बालकाचे यश पाटील याने काड्या खुपसून डोळे फोडले होते. त्यात त्याला असुरी
आनंद मिळाला होता. त्यावेळी तो जामिनावर सुटून बाहेर आला होता. त्यावेळी गावाचे सरपंच
पुरुजीत चौधरी यांनी यश पाटील यास मदत केली होती असा गावक-यांच्या मनात संशय निर्माण
झाला. या समजातून व संशयातून सरपंच पुरुजीत चौधरी यांच्या घरावर जमावाने चाल केली.
सरपंच पुरुजित चौधरी हे कधी डांभुर्णी येथील घरात तर कधी जळगाव येथील घरी कुटूंबासह
राहतात. त्यांच्या कुलुपबंद घरावर संतापलेला जमाव चाल करुन गेला. त्यांच्या राहत्या
घराचे कुलुप तोडून लोकांनी अनाधिकारे प्रवेश करत घरातील साहित्याची नासधूस केली. या
प्रकरणी सरपंच पुरुजीत चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विक्की कोळी
, योगेश कोळी, मराबाई कोळी, सुनील कोळी, निलेश कोळी, भुषण कोळी, शोभा कोळी, संतोष कोळी, संभाजी कोळी, भुषण कोळी, चेतन धनगर, सचिन ठाकुर, राहुल कोळी, गोकुळ कोळी प्रकाश कोळी, कमलाकर कोळी, मोहन कोळी, नर्मदाबाई कोळी, लिलाधर कोळी यांचा मुलगा(पुर्ण नाव माहित नाही), मयुर कोळी, रोहिदास कोळी, एकनाथ कोळी, अभिमन कोळी यांचा भाऊ(पुर्ण नाव माहित नाही), मुकेश कोळी, गोरख आमोदे, श्रावण कोळी, पिंटू कोळी, यासह सुमारे तिस जणांविरुद्ध रितसर गुन्हा दाखल
करण्यात आला.
लोकांचा संताप
अजून शमण्याची चिन्हे दिसत नव्हती. संतापाच्या भरात जमावाने डांभुर्णी ग्रामपंचायतीवर
चाल केली. या घटनेत ग्रामपंचायत कार्यालयातील सामानाची देखील नासधुस करण्यात आली. या
प्रकरणी ग्रामविकास अधिकारी सुनिल नारायण गोसावी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार डांभुर्णी
येथील सुमारे
50 ते 60 जणंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा
प्रकारे यश पाटील यास पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर विविध गुन्हे दाखल झाले व
समाजात तिव्र पडसाद उमटले.
उत्तरीय तपासणीनंतर
मयत कैलास कोळी या विद्यार्थ्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील सोळा वर्षाचा
कैलास कोळी
, जळगाव तालुक्यातील
भोकर येथील अकरा वर्षाचा रोहित सैंदाणे
, टोणगाव ता. भडगाव
येथील नऊ वर्षाचा इशम सय्यद या तिघा अल्पवयीन मुलांचा डांभुर्णी येथील संशयित नराधम
यश पाटील याने अनैसर्गिक कृत्यातून खून केल्याचे उघड झाले. यश पाटील याने पोलिसांना
तशी कबुली दिली. त्याने जिल्हयात अजून असे काही गुन्हे केले आहेत का
? याचा शोध पोलिस यंत्रणा घेत आहे. एकामागून एक असे
तीन निष्पाप बळी या नराधमाने घेतल्याने समाजमनातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
 
विवाह समारंभ, सार्वजनिक कार्यक्रमात अल्पवयीन मुलांना आपल्या
जाळ्यात ओढून त्यांना खाऊचे आमिष दाखवून अथवा शौचास नेवून  अत्याचार व खून करण्याचे काम यश पाटील हा करत होता.
अखेर त्याचे बिंग फुटले व तो पोलिसांच्या ताब्यात आला. या अघोरी कृत्यातून त्याला असुरी
आनंद मिळत होता. तो असुरी आनंद मिळवण्यासाठी यश हा बालकांचे डोळे काड्यांनी फोडून त्यांच्यावर
अनैसर्गीक अत्याचार करत होता. त्यानंतर त्यांचा खून देखील करत होता. या गुन्हयातील
आरोपी यश पाटील यास पकडण्याचे काम यावल पोलिस स्टेशनचे पो.नि. अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलिस उप निरिक्षक जितेंद्र खैरनार
, महिला पोलिस उप निरिक्षक
सुनिता कोळपकर
, हे.कॉ. संजय तायडे, हे.कॉ. सुनील तायडे, हे.कॉ. विकास सोनवणे, पो.कॉ. राजेश वाढे यांनी केले. मात्र गावक-यांनी केलेल्या हल्ल्यामुळे व सतर्कतेचा उपाय म्हणून आरोपी यश यास स्थानिक
गुन्हे शाखेच्या अख्त्यारीत जळगाव येथे हलवण्यात आले. त्याला जिल्हापेठ पोलिस स्टेशनच्या
कस्टडीत ठेवण्यात आले. त्याचा पुढील जवाब घेण्याचे व कायदेशीर सोपास्कर पुर्ण करण्याचे
काम पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले व अतिरिक्त पोलिस अधिक्षक भाग्यश्री नवटके यांचे
मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. बापू रोहोम व त्यांच्या सहका-यांनी पुर्ण
केले.


.

jain-advt

2 COMMENTS

  1. पोलीस निरीक्षक अरुण धनवडे ठरतील यावल पोलीस स्टेशनला एक कर्तव्यदक्ष बेधडक कारवाई करणारे अधिकारी असे कर्तव्यदक्ष अधिकारी प्रत्येक पोलीस स्टेशनला किमान 3 वर्ष सेवेत राहायला पाहिजे यात लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदार संघाच्या सर्वांगीण भवितव्यासाठी, विकासासाठी कोणताही राजकीय हस्तक्षेप करायला नको अशी मागणी संपूर्ण यावल तालुक्यातून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here