पुणे : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. सर्व सरकारी आणि खाजगी कार्यक्रमांना सरकारने बंदी घातली आहे. तरीदेखील आज पुणे येथे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते पणन संचालनालयाच्या नुतनीकृत कार्यालयाचे थाटात उद्घाटन करण्यात आले.
कार्यालयास सदिच्छा भेट या आशयाची जाहीर पत्रिका या कार्यक्रमासाठी काढण्यात आली. या कार्यक्रमाला पणन, सहकार आणि पुणे बाजार समितीचे अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने हजर होते. सोशल डिस्टन्ससह कोरोना प्रतिबंधक नियम केवळ सर्वसामान्य नागरिकांसाठीच आहेत काय? नेत्यांना वेगळे कायदे व नियम आहेत काय? असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. अशा कार्यक्रमांना लोकप्रतिनिधी उपस्थित राहिल्यास त्याच्यावर देखील गुन्हे दाखल करण्याचे आदेश उप मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले आहेत. तरी देखील मंत्रीच नियम पायदळी तुडवत असल्याचे या निमीत्ताने दिसून आले आहे. नुतनीकृत कार्यालयास सदिच्छा भेटीच्या नावाखाली सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्य हस्ते या कार्यक्रमाचे जल्लोषात उद्घाटन झाले.