मुंबई : महाराष्ट्रातील कोरोना विषाणूला आळा घालण्यासाठी कडक लॉकडाऊनची गरज असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठकीत बोलून दाखवली आहे. लॉकडाऊनबाबतचा निर्णय लवकरच दोन दिवसात घेण्यात येणार मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
राज्यातील स्थितीचा योग्य तो अंदाज घेतल्यानंतर निर्णय घेतला जाईल असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. तज्ज्ञांच्या मते 14 दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री म्हणत आहेत. मात्र किमान 8 दिवस तरी लॉकडाऊन लावण्याच्या विचारात मुख्यमंत्री आहेत. त्यानंतर हळूहळू सर्व काही सुरु करण्याची भुमिका मुख्यमंत्री घेणार आहेत.