लॉकडाऊनचा निर्णय आज आणि घोषणा उद्या?

मुंबई : महाराष्ट्रात लॉकडाऊनचा निर्णय आज होणार असला तरी घोषणा उद्या होण्याची शक्यता असल्याचे वक्तव्य मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी म्हटले आहे. राज्यात लॉकडाऊन निश्चीत असला तरी तो किती दिवसांच राहील हा मुख्य प्रश्न असून त्यासाठी गेल्या आठ दिवसांपासून बैठकांवर बैठकांचे सत्र सुरु आहे. लॉकडाऊनच्या या टांगत्या तलवारीमुळे राज्यातील परमबीर सिंग, सचिन वाझे व इतर काही मुद्द्यांपासून जनतेचे लक्ष मोठ्या प्रमाणात बाजुला झाले आहे. . लॉकडाऊनमुळे लोकांचे होणारे संभाव्य नुकसान, रोजगाराचा प्रश्न हेच विषय सध्या चर्चेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here