मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 14 एप्रिलच्या रात्री आठ वाजेपासून राज्यात 15 दिवस (30 एप्रिल 2021 पर्यंत) संचारबंदी (कलम 144) लागू केली आहे. कडक निर्बंध पाळत केवळ आवश्यक कामासाठीच घराबाहेर पडता येईल. सर्व आस्थापना बंद राहतील. मुंबईतील लोकल व बस सेवा केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांसाठी सुरु राहणार आहे. या कालावधीत शिधापत्रिकाधारक गोरगरीबांना प्रति व्यक्ती 3 किलो गहू व 2 किलो तांदुळ मोफत दिले जाणार आहे. या कालावधीत पेट्रोलपंप सुरु राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. हॉटेलवर केवळ पार्सल सेवा सुरु राहील तसेच कर्मचा-यांना कोवीड लसीकरण आवश्यक राहील.