मुंबई : शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आज सीबीआय चौकशी होणार आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला आहे. निलंबीत स.पो.नि.सचिन वाझे यांच्यामार्फत सदर वसुली रेस्टॉरंट, बार चालक आदींकडून अनिल देशमुख करत होते असा आरोप परमबीर सिंग यांनी केल्याने मोठी खळबळ माजली होती.
काही दिवसांपूर्वी सीबीआयने अनिल देशमुख यांना समन्स पाठवले होते. अनिल देशमुखांच्या दोघा स्वीय सहायकांची सीबीआय चौकशी देखील करण्यात आली आहे. संजीव पालांडे व एस. कुंदन या दोघांची या प्रकरणी आठ तास कसुन चौकशी झाली होती. दरम्यान, या प्रकरणात आतापर्यंत अनिल देशमुख यांच्या दोन स्वीय सहाय्यकांची सीबीआयने कसून चौकशी केली होती. देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे व सहाय्यक एस. कुंदन यांची जवळपास आठ तास झाडाझडती घेण्यात आली होती. आज सकाळी अकरा वाजता अंधेरी येथील डीआयओ कार्यालयात अनिल देशमुख चौकशीकामी हजर राहणार आहेत.