पाचोरा : शहरातील ग्रामीण रुग्णालयात कोविड वॅक्सिन देण्याचे काम सुरु आहे. आधी वॅक्सिनकडे पाठ दाखवणारे नागरीक आता वॅक्सिनसाठी तब्बल सहा तास ताटकळत बसल्याचे चित्र पाचोरा शहरात दिसून आले. ताटकळत बसलेल्या नागरिकांना कॉग्रेसच्या मदतीने तातडीने कोविड वॅक्सिन उपलब्ध करुन देण्यात आले.
कोरोना ची वॅक्सिन उपलब्ध असतांना नागरिक गैरसमज करुन सदरची वॅक्सिन घेत नव्हते. सदरची वॅक्सिन घेतल्यावर कोरोना होतोच असा समज होता. आता याच वॅक्सिन साठी लोक रांगा लावत आहेत. अशातच वॅक्सिन चा पुरवठा कमी असतांना नागरीक उत्स्फुर्तपणे पुढे येऊन वॅक्सिन घेउ लागले मात्र पुरवठा कमी असल्याने नागरिकांची ससेहोलपट होत आहे. अशातच पाचोर्यात कोविड वॅक्सिन संपल्या नंतर सकाळ पासून रांगेत उभे असलेले लोक संतप्त झाले यावेळी नागरिकांनी कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांना तात्काळ हा प्रकार कळविला असता सचिन सोमवंशी कोविड वॅक्सिन केंद्रावर पोहचल्यावर रांगेत उभे असलेल्यांना आश्वासन दिले की आजच आपल्याला वॅक्सिन मिळेल. यावेळी जिल्हा नोडल अधिकारी डॉ समाधान वाघ यांना कोविड वॅक्सिन ची लसी तातडीने पाठवण्याची विनंती केली असता तालुक्यातील एका ग्रामीण रुग्णालयातुन मागविण्यात आल्या. कोविड वॅक्सिन चा प्रवास जवळपास तब्बल सहा तासाचा झाला.अखेर एवढ्या वेळा ताटकळत बसलेल्या नागरिकांनी कोविड वॅक्सिन आल्यावर ग्रामीण रुग्णालयातील परीचारीका ज्योत्स्ना पाटील, ऑपरेटर विकी शिरसाठ यांनी दिल्यानंतर नागरिकांच्या चेहर्यावर सुखद दिसले यात 76 वर्षाच्या वृध्द आजी होती तर 85 वर्षाचे आजोबा होते. तर केंद्रातून निघतांना कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांचे आभार मानले.