मुंबई : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्यात आणखी कडक निर्बंध लादण्याची गरज असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. आज दुपारी साडे तिन वाजता मंत्रीमंडळाच्या होणा-या बैठकीत महत्वाचा निर्णय घेतला जाणार असल्याचे म्हटले जात आहे.
सध्य सुरु असलेल्या विविध अत्यावश्यक सेवांची संख्या कमी करण्याचे मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी किराना दुकानांच्या वेळेत देखील लवकरच कपात केली जाणार आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकानांची वेळ कमी केली तर ग्राहकांची मोठ्या प्रमाणात झुंबंड उडण्याची शक्यता व्यापा-यांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या अजुन वाढेल असा युक्तीवाद व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विरेन शाह यांच्याकडून करण्यात आला आहे.






