मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत जाणारी संख्या लक्षात घेत लॉकडाऊनचे निर्बंध अजुन कडक करण्यात आले असून किराना मालासह इतर वस्तूंची दुकाने सकाळी 7 ते 11 पर्यंत सुरु राहणार आहेत. 20 एप्रिलच्या सायंकाळी 8 वाजेपासून ते 1 मे 2021 रोजीच्या सकाळी 7 वाजेपर्यंत हा बदल राहणार आहे.
या बदलानुसार किराणा दुकाने, दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री, भाजीपाला विक्री, फळे विक्री, अंडी,मटण, चिकन,मासे विक्री, कृषी संबंधित सर्व सेवा, पशूखाद्य विक्री, बेकरी, मिठाई दुकाने, सर्व प्रकारची खाद्य पदार्थ, पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने व येणाऱ्या पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकानांचा समावेश राहणार आहे. या दुकानांमधून घरपोच सेवा देण्यासाठी सकाळी सात वाजेपासून सायंकाळी 8 पर्यंत सवलत राहणार आहे. आवश्यकतेनुसार स्थानिक प्रशासन या वेळांमध्ये बदल करु शकते. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाला वाटल्यास कलम दोन नुसार काही गोष्टी व सेवांना, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्य संमतीने आवश्यक सेवा घोषित करु शकते.