मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप झाल्यानंतर त्यांच्याविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केला. या घटनाक्रमानंतर त्यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ आली. आज 24 एप्रिल रोजी त्यांच्या निवासस्थानी व कार्यालयांवर सीबीआयने छापे टाकले आहेत. या छापेमारीमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सीबीआयने देशमुख यांच्या निवासस्थान व कार्यालय अशा विविध दहा ठिकाणी छापे टाकले आहेत. छापेमारी केल्यानंतर पहाटेच हे पथक निघून गेले. देशमुख रहात असलेल्या ज्ञानेश्वरी य बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेज देखील सीबीआय पथकाने नेल्याचे म्हटले जात आहे. या कारवाईच्या घडामोडीनतंर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अटकेची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. न्यायालयात धाव घेऊन अंतरीम जामीन मिळवण्याचा पर्याय देशमुख यांच्याकडे असल्याने ते न्यायालयात जाणार का याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.