लॉकडाऊन वाढीचा निर्णय 30 एप्रिल रोजी

On: April 28, 2021 6:51 PM

मुंबई : सध्या सुरु असलेले लॉकडाऊन 1 मे रोजी सकाळी सात वाजता संपुष्टात येत असले तरी लॉकडाऊन वाढणार असल्याचे म्हटले जात आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तसा खुलासा केला असून लॉकडाऊन वाढवावा लागणार असल्याचे म्हटले आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यम प्रतिनिधींसोबत लॉकडाऊनबाबत बोलतांना टोपे यांनी पुढील लॉकडाऊनबाबत महिनाअखेरीस निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले. कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊन वाढवावा लागणार असल्याची स्थिती राज्यात निर्माण झाल्याचे टोपे म्हणाले. लॉकडाऊन किती दिवस वाढवायचा याबाबत बोलतांना तो किमान 15 दिवसांचा असेल असा अंदाज त्यांनी वर्तवला. राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी लॉकडाऊन गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले आहे. लॉकडाऊन कुणालाही नको असले तरी देखील ते गरजेचे असल्याचे टोपे म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment