पाचोरा : पाचोरा – भडगाव येथील नाभिक समाजाला त्यांचा व्यवसाय करण्यास परवानगी मिळावी अशी मागणी पाचोरा तालुका कॉंग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून प्रांताधिका-यांना केली आहे.
कोरोना महामारीत नाभिक समाजाचा व्यवसाय ठप्प झाला आहे. सद्यस्थितीत लॉकडाऊन शिथील झाले असून व्यवसायाची वेळ सकाळी 7 ते 2 करण्यात आली आहे. मात्र ही वेळ गैरसोयीची असून ग्राहक सकाळी नऊ – दहा वाजेनंतर बाजारात येत असतो. त्यामुळे व्यवसायाची वेळ 11 ते 5 अशी ठेवण्यात यावी. असे केल्यामुळे बाजारात होणारी गर्दी कमी होईल. यासह नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना देखील व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
प्रांताधिका-यांना निवेदन देतांना पाचोरा कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्यासमवेत शहर अध्यक्ष अॅड. अमजद पठाण,जिल्हा उपाध्यक्ष विकास वाघ, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, अल्पसंख्याक जिल्हा सरचिटणीस मनियार,शहर उपाध्यक्ष गणेश पाटील, जिल्हा युवक उपाध्यक्ष अंबादास गिरी, तालुका युवक अध्यक्ष संदीप पाटील, महिला आघाडीच्या अॅड. मनिषा पवार, कुसुम पाटील, शिला सुर्यवंशी, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले,एन एस यु आय चे साई पाटील आदी उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत मागील जळगाव पॅटर्न कसा योग्य होता यावर चर्चा झाली. सदर निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, महसुल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांना पाठविण्यात आल्या आहेत.