जळगाव : शेतकरी नेते आमदार नाना पटोले (अध्यक्ष – महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी) हे 23 जून बुधवार रोजी जळगाव जिल्हा दौ-यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात विविध कार्यक्रम होत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सकाळी 9.00 वा. धनाजी नाना महाविद्यालय ता. यावल येथे आगमन
सकाळी 9.30 वा. धनाजी नाना महाविद्यालय मध्ये केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी तीन काळ्या कायद्यांचे दहन आणि यावल, रावेर, मुक्ताईनगर या तालुक्यातील शेतकरी व कार्यकर्त्यांचा मेळावा
सकाळी 11.30 वा. रामचंद्र हॉल, भुसावळ येथे भुसावळ, जामनेर, बोदवड या तालुक्यातील शेतकऱ्यांचा शेतकरी मेळावा व कार्यकर्ता संवाद कार्यक्रमास उपस्थिती
दुपारी 1.00 वा. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे कोविड सेंटरला भेट व कोविड योध्यांचा सन्मान आणि जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांसोबत बैठक
दुपारी 3.00 वा. जळगाव येथे आगमन व जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक
सायंकाळी 4.00 वा. पत्रकार परिषद (स्थळ : पद्मालय विश्रामगृह, जळगांव)
सायंकाळी 5.00 वा.शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत संवाद – काँग्रेस भवन, (जळगाव शहर – जळगाव ग्रामीण) सायंकाळी 6.45 वा. एरंडोल चौफुली येथे आगमन व स्वागत
सायंकाळी 7.15 वा. धरणगाव येथे आगमन व स्वागत
रात्री 8.00 वा. अमळनेर येथे आगमन व चोपडा-चाळीसगांव – पाचोरा – भडगांव व पारोळा या तालुक्यातील कार्यकर्त्यांसोबत संवाद
रात्री 9.30 वा. किसान काँग्रेस बैठक, अमळनेर