पाचोरा : खा.राहुल गांधी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत पाचोरा येथे संकल्प सप्ताह आयोजीत करण्यात आला आहे. या सप्ताहाअंतर्गत महिला कॉंगेसच्या वतीने सद्गुरु नगर परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली.
यावेळी तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड. अमजद पठाण, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महीला तालुका अध्यक्षा अॅड. मनिषा पवार यांच्यासह जिल्हा उपाध्यक्षा संगिता नेवे, शीला सुर्यवंशी स्थानिक रहीवाशी नलिनी देसले, प्रमिला पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थितीतांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. लावलेल्या प्रत्येक रोपाचे संगोपन करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाला रविंद्र नेवे, बापुराव देसले, भास्कर पाटील, प्रभाकर पाटील, विनोद चौधरी,पंकज पाटील, कुमावत, यश सुर्यवंशी, ऋषीकेश पाटील, गुणवंत जाधव आदींची उपस्थिती होती.