पाचोरा (प्रतिनिधी) : कृषी दिनाचे निमित्त साधत पाचोरा कॉंग्रेसच्या वतीने शेतकरी बांधव अर्थात बळीराजांचा प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन सन्मान करण्यात आला. शेतकरी नेते तथा कॉग्रेस प्रदेश अध्यक्ष आ. नाना पटोले यांच्या प्रेरणेतून पाचोरा कॉग्रेसने हा दिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला. पाचोरा कॉग्रेसचे पदाधिका-यांनी भर पावसात शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना टोप्या, बागायतदार रुमाल, मास्क आणि बांधावर लावण्यासाठी वृक्षांचे रोप देत यथोचित सन्मान केला.
यावेळी तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड. अमजद पठाण, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, जिल्हा अल्पसंख्यांक उपाध्यक्ष इरफान मनियार, महीला तालुका अध्यक्षा अॅड. मनिषा पवार, जिल्हा उपाध्यक्षा संगिता नेवे, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, दिपक सोनवणे, समाधान ठाकरे, शेतकरी संदीप पाटील, लक्ष्मण पाटील, मदन देवरे आदी उपस्थित होते. आपल्या सन्मानासाठी कॉग्रेसचे पदाधिकारी शेताच्या बांधावर आल्याचे बघून सर्व शेतकरी भाऊक झाले होते. जय जवान जय किसान सह कॉग्रेस जिंदाबादच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. कार्यक्रमासाठी सर्व फ्रंटचे पदाधिकारी उपस्थित होते. कॉग्रेसच्या या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाची परीसरात चर्चा यावेळी होती.