मुंबई : उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटच्या नातेवाईकाच्या साखर कारखान्यावर ईडीने जप्ती आणली आहे. ही जप्ती म्हणजे अजित पवारांना एक धक्का असल्याचे म्हटले जात आहे.
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीच्या अधिका-यांनी कारवाई दरम्यान जरंडेश्वर साखर कारखाना जप्त केला आहे. हा साखर कारखाना उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटच्या नातेवाईकाचा आहे. जरंडेश्वर साखर कारखान्यातील आर्थिक गैरव्यवहाराची सुनावणी न्यायालयात देखील जारी आहे. बँकेचे थकीत कर्ज भरले नाही म्हणून सातारा – कोपरगाव येथील जरंडेश्वर साखर कारखान्यावर जप्ती आली होती. माजी मंत्री शालिनीताई पाटील या त्यावेळी कारखान्याच्या संस्थापक आणि चेअरमन होत्या. थकीत कर्जामुळे कारखाना लिलावात काढण्यात आला होता. शिखर बँकेकडून या कारखान्याचा लिलाव करण्यात आला होता. त्यावेळी खरेदीदार कंपनीची उलाढाल एक कोटी रुपयांपेक्षा कमी होती. संबंधीत कंपनीने हा कारखाना साठ कोटी रुपयात खरेदी केला होता. या प्रकरणी आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे दिसून आल्यामुळे ईडीने जप्तीची कारवाई केली आहे.