नवी दिल्ली : प्रेस वॉचडॉग- रिपोर्टर्स विदाउट बाउंड्रीज (RSF), कडून जगातील विविध देशांच्या सुमारे 37 राजकीय नेत्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या राजकीय नेत्यांवर त्या-त्या देशातील पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर गदा आणली असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या यादीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव सामाविष्ट करण्यात आले आहे. तसेच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि हुकूमशहा किम जोंग उन या दोघांचे देखील नाव आहे.
RSF च्या म्हणण्यानुसार इमरान खान यांच्या कार्यकाळात देशावर सैन्याचा मोठ्या प्रमाणात प्रभाव असल्याचे दिसून आले आहे. केव्हाही कधीही सेंसरशिप लावण्यासह वृत्तपत्रांच्या मुद्रण प्रक्रीयेत अडथळे आणण्याचे काम करण्यात आल्याचे इमरान खान यांच्या बाबतीत म्हटले आहे. माध्यम संस्थांना धमकावले जाण्यासह टीव्ही चॅनल्सचे सिग्नल जाम करण्याचे प्रकार इमरान खान पाकीस्तानचे पंतप्रधान झाल्यापासून वाढले असल्याचे आरएसएफ ने म्हटले आहे.