जळगाव : उच्च न्यायालय मुंबई व विधीसेवा प्राधिकरण यांच्या आदेशान्वये दि.1 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आले होते यात दिवाणी व फौजदारी प्रलबित प्रकरण 294 पैकी 16 तर ग्रामपंचायतीचे दाखल पूर्व 2768 पैकी 107 प्रकरण निकाली बँक,म.रा.वी.म.,बीएसएनएलच्या दाखलपूर्व 1183 प्रकरणापैकी 53 प्रकरण निकाली झाले तर एकूण वसुली 6583276 रुपये झाली. यावेळी पॅंनलवर दिवाणी न्यायाधीश डी. जी. म्हस्के यांच्या सोबत अॅड. धर्मेंद्र एस.सोनार, वकील संघाचे अध्यक्ष अॅड. किरण जाधव आदी होते.
चोपडा न्यायालयतील 294 दिवाणी व फौजदारी प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यातून 3 दिवाणी व 13 फौजदारी प्रकरणें निकाली काढण्यात आले. यात 2252794 रुपयांची वसुली झाली. तालुक्यातील ग्रामपंचायतींची एकुण 2768 प्रकरणे लोक अदालतीत ठेवण्यात आली होती. यातून 107 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. त्यात एकूण 280701 रुपये वसुली करण्यात आले. बॅंक ऑफ इंडियाच्या 51 प्रकरणातून 3 प्रकरण निकाली निघाले. यात 15500 रुपये वसुल करण्यात आले.
बॅंक ऑफ बडोदाचे शाखा चोपडा येथील 415 प्रकरणापैकी 3 प्रकरण निकाली निघाले. यात 967000 रुपये वसुल करण्यात आले. धरणगाव अर्बन को. ऑफ.बॅंक लि.च्या विस प्रकरणातून सात प्रकरण निकाली निघाले. यात 147000 रुपये वसुल करण्यात आले. स्टेट बॅंक ऑफ इंडिया अडावद 365 प्रकरणातून सहा प्रकरण निकाली निघाले. यात 990500 रुपये वसूल करण्यात आले.
स्टेट बॅंक ऑफ इंडिया चोपडा 142 प्रकरणातून 8 प्रकरण निकाली झाले. यात 1331000 रुपये वसूल करण्यात आले. स्टेट बॅंक ऑफ इंडिया लासुर 60 प्रकरणातून 8 प्रकरण निकाली झाले. यात 153500 रुपये वसुल करण्यात आले. स्टेट बॅंक ऑफ हैदराबाद चोपडा 42 प्रकरणातून 2 प्रकरण निकाली झाले. यात 120000 रुपये वसूल करण्यात आले. बॅंक ऑफ महाराष्ट्र 42 प्रकरणातून 6 प्रकरण निकाली झाले. यात 298000 रुपये वसूल करण्यात आले.
मराविमडळ शहर 160 प्रकरणातून एक प्रकरण निकाली निघाले. यात 5120 रुपये वसुल करण्यात आले. म.रा.वि.मंडळ ग्रामीण 280 प्रकरणातून 4 प्रकरण निकाली निघाले. यात 11390 रुपये वसुल करण्यात आले. बीएसएनएल 59 प्रकरणातून 5 प्रकरण निकाली झाले. यात 10771 रुपये वसूल करण्यात आले. एकूण दाखल पूर्व प्रकरणात 4330482 रुपये वसूल करण्यात आले. दाखल प्रकरणातून 2252794 रुपये वसूल करण्यात आले. एकूण 6583276 रुपये वसूल करण्यात आले. या दाखल गुन्ह्यात पती पत्नीच्या चार प्रकरणात तडजोड करण्यात आली. तसेच शेतीच्या बांधावरील वाद 2011 ते 2018 पासून महसूल विभागात प्रलंबित होता. तो वाद चोपडा न्यायालयात 2021 ला दाखल करण्यात आला होता. तद्नंतर लोक अदालतीमधे ठेवला असता तो दावा निकाली काढण्यात आला. जुना वाद देखील न्यायालयात मिटविण्यात आल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.
सचिव अॅड. विलास डी. बाविस्कर, उप सचिव दिपक पाटील, उपाध्यक्ष मिलींद बाविस्कर, कोषागार नितीन कोळी, अॅड. प्रसाद काबरे, अॅड.एस.एफ.जैन, अॅड.प्रवीण एच.पाटील, अॅड.एस.एम.बारी, अॅड.उमेश बी.पाटील, अॅड.बी.सी.पाटील, अॅड.नितीन पाटील, अॅड.ए.व्ही.जैन तसेच बार असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यानी व वरीष्ठ लिपिक दिनेश राजपूत, कनिष्ठ लिपिक राजेंद्र ठाकूर आदींनी सहकार्य केले.