जळगाव : जळगाव म.न.पा. क्षेत्रातील क्षेत्रसभेच्या नियमांचे होत असलेले उल्लंघन या विषयावर चर्चा करण्यासाठी जळगाव येथील सामाजीक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.
क्षेत्रसभा नियमांचे पालन व्हावे आणि त्याची सक्ती देखील करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी दीपककुमार गुप्ता आग्रही होते व ती मागणी लवकरच पुर्ण केली जाईल असे आश्वासन गुप्ता यांना राज्यपालांकडून यावेळी देण्यात आले.