कॉंग्रेसतर्फे पाचोरा येथे अनोखी रक्षाबंधन


जळगाव (पाचोरा) : पाचोरा कॉंग्रेसच्या वतीने महीला पदाधिका-यांनी राखी बांधून अनोखा उपक्रम राबवला. महीला आघाडीच्या पदाधिका-यांनी कॉंग्रेसच्या पदाधिका-यांना राखी बांधून त्यांचे औक्षण केले. या अभिनव उपक्रमाचा आदर्श इतर राजकीय पक्षांनी देखील घ्यावा असे म्हटले जात आहे.

पाचोरा तालुका कॉंग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी महीला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा श्रीमती कुसुम पाटील, शहराध्यक्षा श्रीमती शिला सुर्यवंशी, कल्पना निंबाळकर, साक्षी सुर्यवंशी, रेखा पाटील, कमळाबाई पाटील, आदींच्या हस्ते रक्षा बंधनाचा कार्यक्रम झाला. यावेळी तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, माजी प. स. सभापती शेख इस्माईल शेख फकीरा, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, अॅड. वसीम बागवान, मुकेश पाटील, बबलु पाटील, संजय सोनार, पप्पू सोनार आदी पदाधिकारी उपस्थित होते. या अनोख्या कार्यक्रमाची चर्चा शहरात सुरु होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here