जनमत प्रतिष्ठानच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबीर

On: September 13, 2021 12:25 PM

जळगाव – स्वर्गीय किसन नाले यांच्या स्मरणार्थ अ‍ॅडव्हान्स आय केअर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये मोफत नेत्ररोग तपासणी करण्यात आली. डॉ. राहुल महाजन यांनी रुग्णांची नेत्र तपासणी करुन या शिबीरात सहकार्य केले.

महापौर जयश्री महाजन यांनी सुरुवातीला श्री गणेशाची आरती केली. याप्रसंगी बोलतांना महापौर म्हणाल्या की जनमत प्रतिष्ठान हा माझाच परिवार आहे. सर्वांनी एक वृक्ष लावण्यासह परिसर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

कलाशिक्षक सुनील दाभाडे यांचा यावेळी महापौरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, अ‍ॅडवोकेट हेमंत दाभाडे, शक्ती भाऊ महाजन, ललित धांडे, गणेश नाले, कलाशिक्षक सुनील दाभाडे, हर्षाली पाटील, करण राठोड, अंकिता शिंपी, ईश्वर कोळी, राहुल कोळी, गायत्री ठाकरे, सचिन दादा सैंदाणे, प्रकाश सपकाळ, रेड प्लस सोसायटीचे भरत गायकवाड आदींची यावेळी उपस्थिती होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment