पाचोरा – जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे दोन दिवसांपुर्वी तिन मजली इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. या घटनेतील दुर्घटनाग्रस्त इमारतीचे मुंबई स्थित मुळ मालक अद्यापही आलेले नाहीत. या घटनास्थळी पाचोरा कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी भेट दिली.
पाचोरा नगरपरिषेदेने या घटनेतील इमारतीचे मटेरियल तातडीने उचलून जागा व्यवस्थित करावी तसेच इमारतीच्या नुकसानीचा पंचनामा करावा अशी मागणी सचिन सोमवंशी यांनी क्राईम दुनियासोबत बोलतांना केली. सदर ईमारत पडत असतांना व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. सदर ईमारत कोणत्याही क्षणी पडण्याच्या बेतात असल्याचे लक्षात आल्यानंतर यातील भाडेकरी दुसरीकडे स्थलांतरीत झाले होते. त्यामुळे प्राणहानी झाली नाही.
या इमारतीच्या आजुबाजुने कुणी फिरकू नये यासाठी परिसरातील रहिवासी निसार शेख, सागर शेख, शकील शेख इस्माईल आदी बारकाईने लक्ष ठेवून होते. घटनास्थळी भेट देणारे सचिन सोमवंशी यांनी दुर्घटनाग्रस्त ईमारतीच्या पंचनाम्यासह मटेरीयल उचलण्याची मागणी केली आहे.