गोंदिया (अनमोल पटले ) : शारदा महिला बचत गट सिहोरा येथे शिव भोजन केंद्राचे उद्घाटन खासदार प्रफुल पटेल यांच्य हस्ते अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या शिव भोजन केंद्राचा लाभ भंडारा – गोंदिया जिल्ह्यातील जास्तीत जास्त गरीब व गरजु लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खासदार प्रफुल पटेल प्रयत्नशील आहेत. याच अनुषंगाने जिल्ह्यात शिव भोजन केंद्र मंजूर करण्यात आले आहे.
या शिव भोजन केंद्राच्या माध्यमातून गरीब व गरजवंताना भोजन मिळणार आहे. यावेळी सर्वश्री आमदार राजूभाऊ कारेमोरे, माजी खासदार मधुकर कुकडे, नानाभाऊ पंचबुद्धे, धनंजय दलाल, सुनील फुंडे, देवचंद ठाकरे, विजयभाऊ डेकाटे, धनेंद्र तुरकर, सौ.मनीषा नागलवाडे, अरविंद राऊत, संतोष ठाकरे, मधुभाऊ अडमाचे, दिलीपभाऊ शरणागत, हरिचंद बोकडे, माणिक ठाकरे, राजेंद्र ढबाले, विठ्ठल रहमतकर, विनोद मोरे, दीपक कोटांगले, मनोहर कावळे, गोविंद अंबुले व समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.