अकोला : मनोरुग्ण महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी अकोला जिल्हा व सत्र न्यायधिश (पहिले) शयना पाटील यांनी दोघा जणांना दोषी ठरवत विस वर्षाची शिक्षा सुनावली आहे. 2 जानेवारी 2016 रोजी झालेल्या या घटनेप्रकरणी खदान पोलिस स्टेशनला सामुहिक बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.
अनुप उर्फ गुड्डू गणेश परिहार (25) व चंद्रकांत किशोर निलाखे (35) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. सहायक पोलिस निरीक्षक मालती कायटे यांनी या घटनेचा तपास पुर्ण केला होता.
एकुण अकरा जणांच्या साक्षी याप्रकरणी नोंदवण्यात आल्या. सहाय्यक सरकारी वकील अॅड. आनंद गोदे यांनी सरकार पक्षाच्या वतीने न्यायालयीन कामकाज हाताळले. पैरवी अधिकारी कान्हेरकर यांनी सहकार्य केले.