वरिष्ठ महिला व पुरुष तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन

On: October 21, 2021 8:24 PM

जळगाव –  जळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 31 ऑक्टोबर 2021 रोजी जिल्हापेठ व्यायाम शाळा साने गुरुजी वाचनालयाचे बाजूला येथे सकाळी 10 वाजता वरिष्ठ महिला व पुरुष तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर स्पर्धेतील प्रथम विजेते आठ पुरुष व महिला यांचा संघ पुढील महिन्यात पालघर येथे होणाऱ्या वरिष्ठ राज्य स्पर्धेत सहभागी होईल. सदर स्पर्धा जागतिक तायक्वांदो संघटनेच्या नियमानुसार होतील  जास्तीत जास्त खेळाडूंनी यात स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेचे वतीने करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment