जळगाव पोलिस भरती – मैदानी चाचणीत 1140 उमेदवार पात्र

On: November 11, 2021 7:33 PM

जळगाव : जळगाव जिल्हा पोलिस भरती – 2019 साठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. पात्र पुरुष उमेदवारांच्या शारीरीक चाचणीसह कागदपत्र तपासणी प्रक्रिया 9 व 10 नोव्हेंबर या दोन दिवसात पुर्ण करण्यात आली. 11 नोव्हेंबर रोजी पात्र महिला व माजी सैनिक पुरुष उमेदवारांच्या शारिरीक मोजमापासह मैदानी चाचणी व कागदपत्र पडताळणी प्रक्रिया राबवण्यात आली. शारिरीक चाचणीसाठी एकुण 1617 पात्र उमेदवार बोलावण्यात आले. त्यापैकी प्रत्यक्षात 1225 उमेदवार हजर होते. मैदानी चाचणीसाठी (छाती, उंची व कागदपत्र) 1140 उमेदवार पात्र व 84 अपात्र ठरले.

शारिरीक/मैदानी चाचणीत उमेदवारांना मिळालेल्या गुणांची तात्पुरती यादी जळगाव पोलिस दलाच्या www.jalgaonpolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या चाचणीतील गुणांच्या बाबतीत कुणाला काही आक्षेप असल्यास त्यांनी 12 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी तिन वाजेपर्यंत पोलिस उप अधिक्षक मुख्यालय जळगाव यांच्याकडे समक्ष हजर राहून लेखी स्वरुपात आपली तक्रार सादर करायची आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment