पहूर येथे कायदा जनजागृती शिबीर संपन्न

On: November 13, 2021 6:23 PM

जामनेर : पहूर येथे जामनेर तालुका विधी सेवा प्राधिकरण व जामनेर तालुका वकील संघ आणि एस. एस. मणियार लॉ कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने कायदा जनजागृती शिबिर उत्साहात झाले. सदर कार्यक्रम पहूर येथील लोकनियुक्त सरपंच निताताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी ॲड.एस आर पाटील, पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी महिलांविषयी असलेल्या कायद्याची सविस्तर माहिती दिली. राजधर पांढरे, बाबुराव घोंगडे, रामेश्‍वर पाटील, राजू पाटील, शैलेश पाटील, अंगणवाडी सेविका सुषमा चव्हाण यांनी पीडित महिला व त्यांचे अधिकाराविषयी माहिती दिली. देवेंद्र पारळकर यांनी विधी सेवा प्राधिकरणाविषयी सविस्तर मार्गदर्शन करत कार्यक्रमाचा समारोप केला.

यावेळी गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पोलिस पाटील, तलाठी, आशा स्वयसेविका, अंगणवाडी शिक्षिका, जि.प. शाळेतील शिक्षक यांच्यासह सर्व ग्रामस्थ मंडळी, ॲड देवेंद्र जाधव, ॲड प्रसन्न फासे, अँड राहुल बावीस्कर, अँड. कोमल काळे, अँड आशितोष चंदेले, अँड सचिन पाटील, गणेश चौधरी, संकेत राजपूत, उपसरपंच श्याम सावळे, रामेश्वर पाटील, बाबुराव घोंगडे, शिवसेना तालुका प्रवक्ता गणेश पांढरे, माजी सरपंच शंकर जाधव, उपसरपंच राजू जाधव आदींची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वितेसाठी एस. एस. मणियार विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी तेजस्विनी पाटील, कल्पना शिंदे, प्रिया शिंपी, पूजा सांखला, दिक्षा गायकवाड, शालीनी पाटील आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अ‍ॅड. देवेंद्र पारळकर तर सुत्रसंचालन चेतन रोकडे यांनी केले. आभार प्रदर्शन ॲड. प्रशांत पाटील यांनी केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment