लसीचे दोन डोस घेणा-या पोलिसांनाच पगार

On: November 14, 2021 10:59 AM

औरंगाबाद : औरंगाबाद शहर पोलिस दलासह राज्य राखीव दलाच्या सातारा बटालियनमधील ज्या पोलिस अधिकारी अथवा कर्मचा-यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले नसतील त्यांना नोव्हेंबर महिन्याचा पगार दिला जाणार नसल्याचे परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे.

वेळोवेळी आवाहन करुन देखील अनेक जण कोरोना लस घेण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. लस घेतल्याचे प्रमाणपत्र पगाराच्या वेळी सादर करावे लागणार आहे. 17 नोव्हेंबरपर्यंत लसीकरणाचे प्रमाणपत्र सादर केले नाही तर त्याला संबंधीत पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी जबाबदार राहणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment