जळगाव : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासच्या जळगांव जिल्हा संघटनेची पुनर्रचना, जिल्हा, तालुका व शहर कार्यकारणीची नव्याने बांधणी व त्यासाठी कार्यकर्त्यांची निवड करणे, ती निवड मान्यतेसाठी केंद्रीय कार्यालयाकडे रवाना करणे आदी विषयाला अनुसरुन जळगाव येथे 26 नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता समर्थक सदस्य व कार्यकर्त्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. तसेच आंदोलनात, समाजसेवेसाठी नव्याने सहभागी होवू इच्छिणाऱ्या कार्यकत्याची सभा देखील आयोजित करण्यात आली आहे.
याप्रसंगी अशोकजी सब्बन (निरीक्षक तथा सरचिटणीस भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास महाराष्ट्र) यांची उपस्थिती लाभणार आहे.
शुक्रवार दि.26 नोव्हेंबर 2021रोजी दुपारी ठीक 1 वाजता जळगाव येथे होणा-या बैठकीचे स्थान 9822485311 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर सांगितले जाईल.
जळगाव जिल्ह्यातील सर्व प्रामाणिक, चारित्रसंपन्न,त्यागी, निस्पॄह,सामाजिक बांधिलकीची जाणीव असलेल्या व समाज कार्यासाठी वेळ देवू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांनी या बैठकीस वेळेवर हजर राहण्याचे आवाहन जिल्हा संघटक सुरेश पाटील यांनी केले आहे.