मुंबई : राज्यातील 175 पोलिस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी गृह विभागाकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे. या अधिका-यांची पदोन्नती करण्यात आली आहे.
गृहविभागाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार राज्यातील 175 पोलीस निरीक्षकांना पोलीस उपअधिक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर प्रमोशन देण्यात आले आहे.
मुंबई पोलीस दलातील दत्तात्रय शिंदे, श्रीनिवास पन्हाळे, सुर्यकांत बांगर, नितीन बोबडे, रवी सरदेसाई, धर्मेंद्र कांबळे, सावळाराम आगवणे, श्रीराम कोरेगावकर, दिवाकर शेळके, शशिकांत माने, जगदेव कालापाड, मृत्यूंजय हिरेमठ, मनिषा रावखंडे, कुसुम वाघमारे, संजय जगताप, हरीष गोस्वामी, दीपक निकम, किशोर गायके, सुहास हेमाडे, जयंत परदेशी, सुधीर कार्लेकर, दिनकर शिलवते, शरद ओहोळ, मुरलीधर कारकर, विठ्ठल शिंदे, नामदेव शिंदे, बाबासाहेब साळुंखे, शक्तीप्रसाद थोरात यांना सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून मुंबई पोलीस दलातच नव्याने पदभार सुपुर्द करण्यात आला आहे.









