गोंदिया (अनमोल पटले) : अपक्ष म्हणून निवडून आलेल्या स्व.भाऊसाहेब दलाल यांनी शरदचंद्र पवार यांची निष्ठावंतपणे साथ केली. राजकारणा पेक्षा समाजकारण हाच त्यांचा पिंड होता, हा सार्वजनिक वाचनालय त्यांची साक्ष आहे, भाऊसाहेबा सारख्या समाज पुरुषांचा वारसा जपला पाहिजे असे जन्म शताब्दी सोहळ्याप्रसंगी खासदार प्रफुल पटेल यांनी उदघाटकीय भाषणात सांगितले.
त्यांनी भाऊसाहेबांच्या आठवणींना उजाळा देत आपली आदरांजली वाहिली. या सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानी नामदार नवाब मलिक होते, मलिक यांनी ग्रंथालयातील दुर्मिळ ग्रंथाचे डिजीटाईझेशन करून संरक्षण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले, या सभारंभाला अतिथी म्हणून आमदार राजुभाऊ कारेमोरे, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, माजी आमदार दीनानाथ पडोळे, माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार नरेंद्र भोंडेकर, माजी मंत्री सुबोध मोहिते पाटील, माजी खासदार मधुकर कुकडे,
विलास शृंगपवार, नाना पंचबुद्धे, जयंत वैरागडे, सुनील फुंडे, गुणवंत काळबांधे, धनंजय ढगे, घुसाजी मेश्राम, नरेश आंबिलकर, मदन बागडे, गोविंदराव चरडे, शेखर गभने, डॉ प्रकाश मालगावे, उल्हास फडके, अनंत गुप्ते, नीलकंठ रणदिवे, विनोद आकरे, निळकंठराव साखरवाडे, सुमंत देशपांडे, उद्धवराव डोरले, ईश्वरलाल काबरा, गुरुप्रसाद पाखमोडे, आशिष दलाल, डॉ. सौ. वसुधा आठवले, डॉ. सौ. विशाखा गुप्ते, नगरातील डॉक्टर्स, विविध संस्थेचे पदाधिकारी आदी मान्यवरांची उपस्थिती होते.
या प्रसंगी भाऊसाहेबांच्या आठवणींची स्मरणिका पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. तसेच कोविड योध्यांचा तसेच भाऊसाहेबांच्या सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचनालयाचे अध्यक्ष धनंजय दलाल यांनी केले, कार्यक्रमाचे संचालन कार्यवाह डॉ. जयंत आठवले यांनी तर आभार प्रदर्शन सहकार्यवाह प्रदीप गादेवार यांनी केले.