उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा कारभार वा-यावर!– एकाचे मायग्रेशन गेले दुस-याच्याच पत्त्यावर !!

On: December 9, 2021 9:31 PM

जळगाव (क्राईम दुनिया न्यूज नेटवर्क) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कारभाराबद्दल विद्यार्थी वर्गाच्या काहीना काही तक्रारी सुरुच असतात. उत्तीर्ण असूनही अनेक विद्यार्थ्यांना विनाकारण रि चेकिंगचा फॉर्म भरण्याचा भुर्दंड अनेकदा बसला आहे. या प्रकारामुळे विद्यार्थी वर्गाला नाहक मनस्ताप आणि वेळेचा अपव्यय होण्याच्या घटना घडलेल्या आहेत.

आताच्या ताज्या घटनेत एका विद्यार्थ्याचे मायग्रेशन सर्टीफिकेट दुस-याच विद्यार्थ्याच्या पत्त्यावर गेले आहे. या घटनेमुळे मायग्रेशन सर्टिफिकेटची अत्यावश्यक गरज असलेल्या दोघा विद्यार्थ्यांपुढे एक संकट निर्माण झाले आहे.

मोहम्मद फैजान मोहम्मद रफिक खरबडी रोड मोताळा जिल्हा बुलढाणा या विद्यार्थ्याच्या पत्यावर उमविचे मायग्रेशन सर्टीफिकेटचे पाकीट बरोबर पोहोचले. मात्र पाकिटात शेख तौसिफ शेख हमीद (शमीना बी) या विद्यार्थ्याचे मायग्रेशन सर्टीफिकेट आले आहे. मोहम्मद फैजान या विद्यार्थ्यास स्वतः च्या नावाच्या प्रमाणपत्राची नितांत गरज असतांना दुसऱ्याचे प्रमाणपत्र आले आहे. अशीच अवस्था शेख तौसिफ या विद्यार्थ्याची झाली असेल हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. आपल्याला आपल्या नावाचे प्रमाणपत्र तातडीने मिळावे एवढी माफक अपेक्षा विद्यार्थी मोहम्मद फैजान या विद्यार्थ्याने “क्राईम दुनिया” सोबत बोलतांना व्यक्त केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment