संघर्ष सावळे ‘संशोधन रत्न’ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

On: December 20, 2021 3:00 PM

गोंदीया (अनमोल पटले) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागातील संघर्ष सावळे यांना ‘संशोधन रत्न’ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन कार्याची दखल ब्रेव सोसायटी इंडिया औरंगाबाद या संस्थेच्या वतीने घेण्यात आली.

यापुर्वी देखील त्याना “यंग बेस्ट रिसर्चर अवॉर्ड’ न्यू दिल्ली ने 2020 ला सन्मानित करण्यात आले आहे. या सत्कार सोहळ्याप्रसंगी जिल्हाधिकारी, जिल्हा न्यायधीश सुनील चव्हाण औरंगाबाद, संदीपराव भुमरे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री, चंद्रकांत खैरे माजी लोकसभा सदस्य, प्रा. टी. आर .पाटील (एन. एस .एस प्रमुख), प्रा. आम्रपाली त्रिभुवन प्रोजेक्ट ऑफिसर, रमेश पवार जिल्हा परिषद सदस्य आदगाव औरंगाबाद, सुदाम भागवत सपोनि वैजापूर आदींची उपस्थिती होती. प्रा.डॉ अशोक पवार, सु.मा. शिंदे, प्रा. डॉ. किशोर वाघ, प्रा.एस. पी. हिवाळे, प्रकाश इंगळे, अनिल दिपके, दिनेश लहाडे, हर्षपाल खाडे, अण्णासाहेब सोनवणे आदींनी त्यांचे अभीनंदन केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment